mumbai crime vivek phansalkar mumbai police commissioner says there is no excuse for a mistake nrvb
मुंबई – मुंबईत २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणारे संदेश मुंबई पोलिसांना पाकिस्तान कोड असलेल्या फोन नंबरवरून आले होते, असे शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शनिवारी सांगितले. तसेच त्यांनी आम्ही सगळी काळजी घेतली असून लवकरच याची चौकशी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषद झाल्यानंतर तासाभराच्या आत मुंबई पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. विरारमधील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संशयित व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेली व्यक्ती उत्तरप्रदेशातली असल्याचे कळते.
पोलिसांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या एका क्रमांकावरून यासंबंधीचा एक व्हॉट्सअॅप मेसेज मिळाला होता. त्यात मुंबईत धमाका करण्याचा व यासाठी भारतात ६जण कार्यरत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हेल्पलाइन क्रमांकावर अनेक धमकीचे मजकूर प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेण्यात आली. देण्यात आलेल्या मॅसेजमध्ये हल्ला करून शहर उडवले जाईल असा मॅसेज देण्यात आला होता. त्यांनंतर आयुक्त फणसळकर यांनी सांगितले की मुंबईला २६/११ हल्ल्या सारखे उडवण्याचे धमकीचे संदेश पाकिस्तान कोड असलेल्या नंबरवरून आले होते. त्यामुळे पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही सगळे संदेश गांभीर्याने घेतले आहेत. धमकीच्या संदेशांची चौकशी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आम्ही किनारपट्टीच्या सुरक्षेबाबत सतर्क आहोत आणि तटरक्षक दलाशी समन्वय साधत आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे.