devendra fadnavis and basavraj bommai
नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील काही गावांवर दावा केल्यानंतर सीमावाद पुन्हा पेटला आहे. तसेच बेळगावमध्ये कन्नड वेदिकेच्या संघटनेनं महाराष्ट्रातील गाड्यावर हल्ला केल्यानंतर याचे पडसाद मागील एक महिन्यापासून राज्यसह देशभरात उमटताहेत. हा विषय संसदीय अधिवेशनात सुद्धा उपस्थित करण्यात आला होता. यावर महाराष्ट्र सरकार ठाम भूमिक घेत नसल्यानं सरकारला मोठ्या रोषाला सामोरी जावे लागले. कर्नाटक सरकारने मागील आठवड्यात सीमाप्रश्नी एकमताने ठराव मांडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील ठराव मांडावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अनेक चर्चा आणि गदारोळानंतर मंगळवारी अखेर सीमाप्रश्नी विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटकच्या मंत्र्यांच्या यावर प्रतिक्रिया समोर येत आहेत.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई रुग्णालयात दाखल, प्रकृती खालावल्याने उपचार सुरु… https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-mother-admitted-to-hospital-treatment-started-due-to-deteriorating-condition-357538.html”]
दरम्यान, कर्नाटकचे विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई ही केंद्रशासित करा असं म्हटलं आहे. याचे पडसाद उमटताना दिसताहेत. तसेच यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहत. दरम्यान, आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक मंत्र्यांच्या या वक्तव्याचा विधिमंडळात निषेध करून कर्नाटक सरकारला तसे पत्र पाठवण्याची मागणी केली होती. मुंबई महाराष्ट्राचीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, मुंबई कोणाच्या बापाची नाही.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने ज्या सीमाभागांवर दावा केला आहे, त्यांचाच उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत कोणतेही राज्य सीमाभागाबाबत नव्याने दावा करणार नाही, असे एकमताने ठरले होते. तरीसुद्धा ते सीमाभागातील गावांवर दावा करताहेत, कर्नाटकच्या बोलघेवड्या नेत्यांचा असा दावा खपवून घेतला जाणार नाही., कर्नाटक मंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिली जाईल व कर्नाटक सरकारलाही निषेधाचे पत्र पाठवले जाईल, असं फडणवीस म्हणाले.