Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर सुटलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यावरूनही राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका झाली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2025 | 09:46 AM
Dharashiv Politics:

Dharashiv Politics:

Follow Us
Close
Follow Us:
  • धाराशिवमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी
  • ओमराजे निंबाळकर यांची भाजपवर टिका
  • आरोपी विनोद गंगणेमुळे प्रकरणाचा तपास करण्यात मदत -राणा राणाजगजितसिंह पाटील
BJP Nominates Tuljapur Drugs Case: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. इच्छुकांनी उमेदवारी साठी रांगा लावल्या आहेत. अशातच धाराशिव ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.विनोद गंगणे याला तिकीट दिल्यामुळे धाराशिवमध्ये विरोधी पक्षाकडून टिकेची झोड उठली आहे. शिवसेनेच्या (shivsena)  उद्धव ठाकरे गटाचे आमदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले होते. या प्रकऱणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणण्यासाठी विनोद गंगणेची मदत होत असल्याचा दावा राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. तर विनोद गंगणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असून तो जामीनावर बाहेर असल्याचा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर सुटलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये (BJP)  प्रवेश देण्यात आला होता. त्यावरूनही राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका झाली. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजश्रय देत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले होते. त्यात आता पुन्हा विनोद गंगणे याला भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निवडणूकीत तुळजापूर ड्रग्जचा मुद्द्यावरून राजकारण तापणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी

पालघर जिल्ह्यातील भाजप गोटातून मोठी घडामोड समोर आली असून काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला प्रदेश कार्यालयाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चौधरी यांचा पक्षप्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात पूर्वी भाजपनेच काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर राज्यभरातून विरोधकांकडून तीव्र टीका आणि आरोपांची मालिका सुरू झाली होती. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींनी चौधरी यांच्या प्रवेशावर प्रदेश कार्यालयामार्फत स्थगिती लागू केली आहे.

पालघर साधू हत्याकांड (Palghar Mob Lynching Case) प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, स्थानिक स्तरावर झालेल्या काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे.

 

 

Web Title: Dharashiv politics bjp nominates accused in drug case for mayor post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • BJP
  • Local Body Election
  • shivsena

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
2

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
3

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
4

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.