
फोटो सौजन्य शोशल मिडिया
Mumbai BMW Accident : आज रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात झाला. हा अपघात मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीकडे जात असताना घडला. तर लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ हा अपघात घडल्यांचे सांगितले जात आहे . हा अपघात पहाटे ०५.२० च्या सुमारास घडला, बीएमडब्लयूच्या कारचालकाने अतिवेगाने कार चालवल्यामुळे हा अपघात घडला, असे कोस्टल रोड नियंत्रण कक्षाने म्हंटले आहे.
मुंबईच्या कोस्टल रोडवर रात्री आणि पहाटे च्या वेळेस येथे अतिवेगाने गाड्या चालवल्या जातात, अशा तक्रारी वारंवार येत असतात. या आधी सुद्धा मुंबई कोस्टल रोडवर अपघात घडल्याची घटना समोर आली, या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अवघ्या १० मिनिटांत मरीन ड्राइव्ह, मुंबई कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंक …
नायर रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम
घडलेल्या अपघातातील सर्व मृतदेह पोस्टमाॅर्टम साठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. या मध्ये २५ वर्षीय अनोळखी तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पोलिस करत आहे. अपघातातील गंभीर झालेल्या जखमी तरुणावर डॉक्टरांचे लक्ष आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे. या दुर्घटनेने तीन तरुणांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.