Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत! मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

मुंबईतील सामान्य कुटुंबांत आणि चाळीत वाढलेल्या सात खेळाडूंनी मर्यादित सुविधा व आर्थिक अडचणींवर मात करत भूतानमध्ये भारताचा झेंडा उंचावला. सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक मिळवत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून दिली.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 06:51 PM
मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

मुंबईच्या सात खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या सात खेळाडूंची भूतानमध्ये दमदार कामगिरी.
  • सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.
  • रविंद्र चव्हाणांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विजेत्यांचे कौतुक केले.
 

मुंबईच्या चाळीतून आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठापर्यंत मजल मारत सात खेळाडूंनी आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी साकारली आहे. या खेळाडूंच्या कामगिरीची भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दखल घेत त्यांचे कौतुक केले.

मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि प्रशिक्षणाच्या मर्यादा असूनही या खेळाडूंनी भूतानमध्ये पार पडलेल्या दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली.

मुंबईच्या चाळीतून थेट चॅम्पियनशिपपर्यंत

विराज भिलारे, गौरव सोनावणे, ऋग्वेद राहुल मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धाधम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे अशी या सात विजेत्या खेळाडूंची नावे आहेत. विशेष म्हणजे सातही खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक सामन्यांमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात मोठी मदत झाली.

Smart Meter Issue: स्मार्ट मीटरने वाढवली डोकेदुखी; नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या, भीम पँथरचा धडक मोर्चा

या खेळाडूंच्या यशामागे कोणत्याही मोठ्या क्रीडा केंद्राची किंवा अत्याधुनिक सुविधांची पार्श्वभूमी नव्हती. मुंबईतील चाळीतील अरुंद जागा, सार्वजनिक मैदानांवर केलेला सराव आणि उपलब्ध साधनांमध्ये प्रशिक्षण घेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून खेळाडूंची दखल

या सात खेळाडूंच्या कामगिरीची भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दखल घेत त्यांचे कौतुक केले. आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमधून ते म्हणाले, “मुंबईतील चाळीतून थेट चॅम्पियनशिप ट्रॉफीपर्यंत एक प्रेरणादायी प्रवास … मुंबईतील चाळीत आणि वंचित कुटुंबांत वाढलेल्या ७ खेळाडूंनी भूतानमध्ये झालेल्या ‘दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप’मध्ये आपल्या बहारदार खेळीतून भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. विराज भिलारे, गौरव सोनावणे, ऋग्वेद राहुल मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धाधम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे या सातही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेच, शिवाय भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी ही मिळवून दिली.”

मुंबईतील चाळीतून थेट चॅम्पियनशिप ट्रॉफीपर्यंत : एक प्रेरणादायी प्रवास मुंबईतील चाळीत आणि वंचित कुटुंबांत वाढलेल्या ७ खेळाडूंनी भूतानमध्ये झालेल्या ‘दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिप’मध्ये आपल्या बहारदार खेळीतून भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. विराज भिलारे, गौरव सोनावणे,… pic.twitter.com/ioTgfhFRSk — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) August 20, 2026

ते पुढे म्हणाले, “हा प्रवास सोपा नव्हता. घरची बेताची परिस्थिती, खेळासाठी अपुऱ्या सुविधा आणि परदेशातील स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक अडचणी… तरीही चाळीतील अरुंद जागा आणि सार्वजनिक मैदानांवर सराव करत त्यांनी आंतरराष्ट्रीय मैदान गाजवलं. परिस्थिती प्रतिकूल होती, पण जिद्द मोठी होती. स्वप्न खडतर होतं, पण ध्यास त्याहून मोठा होता. या सात चॅम्पियन्सच्या जिद्दीला, मेहनतीला आणि भारताचा तिरंगा उंचावणाऱ्या कर्तृत्वाला सलाम!”

सामान्य कुटुंबातून आलेल्या खेळाडूंना योग्य संधी, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, याचे हे उदाहरण मानले जात आहे. या सातही खेळाडूंचा प्रवास केवळ पदक जिंकण्यापुरता मर्यादित नसून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याची प्रेरणा देणारा आहे. चाळीतील साध्या वातावरणातून सुरू झालेला हा प्रवास दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या सात मुंबईकर चॅम्पियन्सची कहाणी नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Web Title: Mumbai chawl players south asian box langdi championship ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
1

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…
2

सासूने मोलकरणीला दिली सुनबाईच्या हत्येची सुपारी; तीन लाखांत सौदेबाजी केली अन्…

Maharashtra Breaking News Today 2026:  पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
3

Maharashtra Breaking News Today 2026: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण
4

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.