Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू

Mumbai Goa Highway Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर कारने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात कार कंटेनरखाली अडकल्यानं कारचा चुराडा झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 13, 2025 | 04:35 PM
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; महिला डॉक्टरचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Mumbai Goa Highway Accident News Marathi: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढतच चालले असून माणगाव तालुक्यातील लाखपाले येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले वैद्यकीय अधिकारी गंभीर जखमी झाले.

मृत महिला डॉक्टरांची ओळख डॉ. प्रियंका भास्कर आहेर (वय 32, मूळ रा. बीड, सध्या रा. पुणे) अशी असून, जखमी डॉक्टरांचे नाव डॉ. विशाल रमेश बडे (वय 30, रा. अनपटवाडी पारगाव, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. पुणे) आहे.

शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कंटेनर चालक राहुल रामचंद्र यादव (वय 24) हा महाडहून मुंबईकडे जात होता. चढावाच्या रस्त्यावर कंटेनर एका लेनवरून दुसऱ्या लेनवर वाकडी-तिकडी चालवत असताना, लाखपाले येथील निर्मल एच. पी. पेट्रोलपंपासमोर कंटेनर आणि डॉक्टरांच्या कारची जोरदार धडक झाली.

धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पुढील भाग थेट कंटेनरच्या मागील चॅसिसखाली अडकला. यात डॉ. आहेर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. डॉ. बडे यांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांची कारवाई

घटनास्थळाची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर हे करत आहेत. या वेळी ट्रॅफिकचे दळवी व इतर ट्रॅफिक पोलीस उपस्थित होते.

महामार्गावरील वाहतुकीस अडथळा येऊ नये याचीही दक्षता : “टेमपाले गाव हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावर कंटेनर आणि वॅगनआर कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा येऊ नये याचीही दक्षता घेण्यात आली. घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात वाहनांचा वेग आणि रस्त्यावरील परिस्थिती हे अपघाताचे कारण असल्याचा अंदाज आहे,” असंही गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी सांगितल आहे.

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली

Web Title: Mumbai goa highway accident 32 year old women doctor dies one critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai-Goa highway
  • Pune

संबंधित बातम्या

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द
1

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक
2

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
3

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Vakola BKC Flyover: वकोला-BKC प्रवास अवघ्या 5-10 मिनिटांत! 98% काम पूर्ण, फ्लायओव्हर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
4

Vakola BKC Flyover: वकोला-BKC प्रवास अवघ्या 5-10 मिनिटांत! 98% काम पूर्ण, फ्लायओव्हर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.