Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

Mumbai News: गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जावेत यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित करणारी नियमावली तयार करण्यात आली आहे. संबंधित नियमांचे उलंघन केल्यास कारवाई केली जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 22, 2026 | 09:00 AM
ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

ध्वनिप्रदूषणावर मुंबई हायकोर्टाची सुमोटो दखल! उत्सवांचा अधिकार आहे; पण नागरिकांच्या हक्कांवर गदा नको

Follow Us
Follow Us:

Mumbai News: गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि अन्य सण-उत्सवांदरम्यान लाऊडस्पीकर, अॅमप्लफायर आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून घेतली. न्यायालयाने याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली असून, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन होते का, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ही केली. स्वतःहून याचिका दाखल न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी खंडपीठाने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

उत्सवाला आक्षेप नाही

गणेशोत्सव किंवा विसर्जन मिरवणुकांना न्यायालयाचा विरोध नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र, उत्सव साजरे करताना सर्वसामान्य नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांचा आणि ध्वनिप्रदूषणाच्या दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. मिरवणुकीत एकाच वेळी मोठ्या आवाजात संगीत वाजवणे आणि फटाके फोडणे यामुळे एकत्रित ध्वनीची पातळी वाढते. त्यामुळे निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले.

फटाक्यांवर बंदीची वेळ?

मुंबईतील आधीच गंभीर असलेल्या वायुप्रदूषणात फटाक्यांमुळे आणखी भर पडते. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने वाहने, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे अपघाताचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याची वेळ आली आहे का, याबाबत न्यायालयाने प्रथमदर्शनी निरीक्षण नोंदवले.

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

सरकारकडून सविस्तर माहिती मागवली:

गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जातात का, आवाजाची मर्यादा निश्चित करणारी नियमावली काय आहे, तिची अंमलबजावणी कशी केली जाते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते, याची माहिती न्यायालयाने मागवली आहे. मुंबईमध्ये वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai high court takes suo motu cognizance of noise pollution there is a right to celebrate festivals mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Ganeshotsav 2026
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
1

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
2

फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश
3

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त
4

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.