Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणतीही तडजोड करणार नाही..; दिल्ली हायकमांडकडून फडणवीसांना मेसेज

एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे सेनेत तणाव वाढतच चालला आहे. पण दुसरीकडे मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणताही तडजोड कऱणयास तयार नसल्याचेही दिसत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 20, 2026 | 09:55 AM
Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणतीही तडजोड करणार नाही..; दिल्ली हायकमांडकडून फडणवीसांना मेसेज
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच मोठ्या बहुमताने विजय
  • भाजपला ११४ इतका बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांची गरज
  • मुंबईच्या महापौर पदावर भाजपचाच हक्क
Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच मोठ्या बहुमताने विजय मिळवला. पण त्यानंतरही भाजपमसमोरील महापौर पदाच्या आव्हानाचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवायचा असा निर्धार भाजपने केला होता, पण तरीही त्यांनी केवळ ८९ जागांवर समाधान मानावे लागले. मुंबई महापालिकेवर भाजप महायुतीचा महापौर बसवण्यासाठी भाजपला ११४ इतका बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांची गरज आहे.

भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी त्यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळावे आणि इतर समित्यांमध्येही योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे भाजप आणि शिंदे सेनेत तणाव वाढतच चालला आहे. पण दुसरीकडे मुंबई महापौर पदाबाबत भाजप कोणताही तडजोड कऱणयास तयार नसल्याचेही दिसत आहे.

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO

महापौर पदाच्या पेच प्रसंगात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने महापौर पदावरही भाजपचाच हक्क असल्याचे मित्र पक्षांना सांगा,” असा स्पष्ट संदेश दिल्ली हायकमांडकडून आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला अनेक दशकांनंतर मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावर भाजपचाच कसा हक्क आहे. ही भूमिका एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेतेतील नेत्यांना समजावून सांगा. पण हे करताना कोणतेही मतभेद होणार नाहीत, याचीही काळजी घ्या, असे दिल्लीतील पक्षनेतृत्त्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. (Municipal Election Result 2026)

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणनीतीबाबत भाजप नेतृत्वाकडून महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली आहे. मुंबईचे महापौरपद भाजपकडेच असावे, अशी भावना हजारो कार्यकर्त्यांची असून या भावनेचा सन्मान व्हायला हवा, असे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन त्यांना ही बाब पटवून देण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अन्य महत्त्वाची पदे आणि राज्यातील इतर महानगरपालिकांबाबतही दोन्ही मित्रपक्षांशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत.

Web Title: Mumbai mayor bmc election 2026 the bjp will not compromise on the mumbai mayors post a message from the delhi high command to fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • BMC Election 2026

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.