काय घडलं नेमकं?
संबंधित मुलाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून दोन तरुणांनी त्याला लक्ष केले. १७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा तो मुलगा कोथरूड भागातून जात होता. तेव्हा त्याला रस्त्यात अडवले. स्वामी समर्थ मठाजवळ गाठून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
का करण्यात आला हल्ला?
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या भांडणामुळे हा रक्तरंजित हल्ला झाला असून आरोपी सध्या पसार झाले आहेत.
आरोपींचा शोध सुरु
याप्रकरणी बलराम हनुमंत लोखंडे (वय 24) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत. पोलीस लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Crime News : तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी…; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी समीर हाश्मी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र तरुणीने त्याच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपी चिडला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
घटनेच्या दिवशी आरोपी थेट तरुणीच्या घरात शिरला. “तू माझ्यावर प्रेम केले नाहीस तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही,” अशी धमकी देत त्याने तरुणीला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने त्याला घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी अधिकच संतप्त झाला. त्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी समीर हाश्मी याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा
Ans: कोथरूड परिसरात, 17 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास.
Ans: शाळेत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला.
Ans: दोन्ही आरोपी सध्या पसार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.






