Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News: १८७२ ते १९११ या कालखंडात कॉलराची साथ रोखण्यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न, स्वच्छतेचे नियम आणिमूलभूत नागरी सुविधांचा विकास यांचा तत्कालीन प्रशासनाशी, असलेला परस्परसंबंध उलगडण्याचा त्यांचा मानस आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 08:49 AM
मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबईत मुंबई से नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दीडशे वर्षापूर्वी कॉलराच्या साथीवर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने नक्की काय उपाययोजना केल्या होत्या, सार्वजनिक आरोग्य आणि नागरी प्रशासनाने या संकटाला कसे तोंड दिले होते, याचा वेध आता एका विशेष ऐतिहासिक संशोधनातून घेतला जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून इतिहास विषयात पीएच.डी. मिळवलेले स्वतंत्र इतिहासकार डॉ. विवेक नीलकंठन हे मुंबईतील कॉलराच्या इतिहासावर आधारित ग्रंथ लिहीत असून, त्यांच्या या संशोधनासाठी मुंबई पालिकेने सन १८७२ ते १९११ या सुमारे चार दशकांतील स्थायी समितीचे ऐतिहासिक अभिलेख तपासण्यास सशर्त मंजुरी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

शैक्षणिक कामांसाठी शुल्कमाफी

मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम ३६ (ओ)। नुसार पालिका सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही असे जुने दस्तऐवज पाहण्यासाठी विहित शुल्क भरावे लागते. मात्र, हा एक महत्वाचा शैक्षणिक व ऐतिहासिक प्रकल्प असल्याने हे शुल्क माफ करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. यापूर्वीही अशा प्रकारे शैक्षणिक कामांसाठी शुल्कमाफी देण्यात आली होती.

महत्त्वाचे म्हणजे, या ऐतिहासिक कागदपत्रांच्या पाहणीसाठी आकारले जाणारे शुल्कही माफ केले जाणार आहे. डॉ. विवेक नीलकंठन यांनी मुंबई विद्यापीठातून २००४ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, सध्या ते वसाहतकालीन मुंबईतील आरोग्य व्यवस्था आणि साथीच्या रोगांवर संशोधन करत आहेत. १८७२ ते १९११ या कालखंडात कॉलराची साथ रोखण्यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न, स्वच्छतेचे नियम आणिमूलभूत नागरी सुविधांचा विकास यांचा तत्कालीन प्रशासनाशी, असलेला परस्परसंबंध उलगडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या अभ्यास प्रकल्पाला मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी साळवी यांनीही शिफारसपत्राद्वारे पाठिंबा दिला आहे.

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

पालिकेने संशोधकावर घातल्या काही कडक अटी

हे अत्यंत जुने आणि मौल्यवान दस्तावेज असल्याने पालिकेने संशोधकावर काही कडक अटी घातल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच मूळ अभिलेखांची पाहणी करावी लागेल, तसेच हे नाजूक दस्तऐवज काळजीपूर्वक हाताळण्याचे हमीपत्र संशोधकाला द्यावे लागेल. या नोंदीमधील माहितीचा कोणताही गैरवापर करता येणार नाही आणि पालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय ही माहिती अन्य कोणत्याही व्यक्तीला देता येणार नाही. याशिवाय, संशोधन पूर्ण झाल्यावर तयार होणाऱ्या ग्रंथाची किंवा पालिकेशी संबंधित प्रकरणाची एक प्रत पालिका सचिवांकडे जमा करावी लागणार आहे. हा संपूर्ण प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news 150 year old civic documents to reveal the history of cholera in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • Health Updates
  • Monsoon
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
2

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
4

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.