Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

Mumbai News: बाणगंगा तलावाला शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्व आहे. त्यामुळे दररोज शेकडो भाविक या ठिकाणी पितृकार्य, श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी येत असतात. या विधीदरम्यान पिठाचे गोळे, भात, तीळ आणि इतर खाद्यपदार्थ तलावात विसर्जित केले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 09:39 AM
ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो माशांचा मृत्यू! पिंडदान विधीतील अन्नपदार्थ कुजल्याने दुर्घटना

Follow Us
Follow Us:

Mumbai News: दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक व वारसा दर्जा लाभलेल्या पवित्र ‘बाणगंगा’ तलावामध्ये शेकडो माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तलावामध्ये नियमितपणे होणाऱ्या धार्मिक विधी व पिंडदान प्रक्रियेमुळे हे पाणी प्रचंड प्रमाणावर दूषित झाले असून, त्यामुळेच माशांचा जीव गेल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

बाणगंगा तलावाला शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्व आहे. त्यामुळे दररोज शेकडो भाविक या ठिकाणी पितृकार्य, श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी येत असतात. या विधीदरम्यान पिठाचे गोळे, भात, तीळ आणि इतर खाद्यपदार्थ तलावात विसर्जित केले जातात. हे अन्नपदार्थ तळाशी साचून मोठ्या प्रमाणावर कुजले आहेत. या सेंद्रिय घटकांमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत खालावले आहे.

स्थानिकांनी मृत मासे वेचून काठावर आणले

तलावाच्या पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसताच स्थानिक नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत पाण्यात उतरून स्वच्छता मोहीम हाती घेतली. स्थानिकांनी पाण्यातील मृत मासे वेचून काठावर आणले असता अवघ्या काही वेळातच प्लास्टिकचे अनेक मोठे क्रेट्स मृत माशांनी तुडुंब भरले.याशिवाय, पाण्याखालून पिठाचे न कुजलेले गोळे आणि अन्नपदार्थांचे थरच्या थर बाहेर काढण्यात आले. हे मृत मासे वेळेवर हटवले नाही तर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरेल आणि साथीचे रोग उद्भवतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्वतंत्र व्यवस्थेसह कडक नियमावलीची मागणी

मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य आणि जलसंधारण खाते या ऐतिहासिक वास्तूच्या देखभालीकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर राखतानाच तलावातील जैवविविधतेचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.त्यासाठी धार्मिक विधी व पिंडदान करण्यासाठी तलावाबाहेर स्वतंत्र कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात यावी.

Sheetal Mhatre: मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा; शीतल म्हात्रेंची मागणी

तलावाच्या मूळ पात्रात अन्नपदार्थ व निर्माल्य टाकण्यास सक्त मनाई करण्यात यावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news hundreds of fish found dead in historic banganga tank rotting food from pind daan ritual suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • lake
  • Mumbai News
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Avidhwa Navami: अविधवा नवमी म्हणजे काय? या दिवशी कसे केले जाते पूर्वजांचे स्मरण, जाणून घ्या
1

Avidhwa Navami: अविधवा नवमी म्हणजे काय? या दिवशी कसे केले जाते पूर्वजांचे स्मरण, जाणून घ्या

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी
2

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प
4

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.