Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai High Court: भाजप सरकार मुर्दाबाद म्हटल्याने कोणी तडीपार होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Mumbai High Court : संविधानाच्या कलम १९ आणि २१ नुसार, देशातील प्रत्येक नागरिकाला केवळ आपली मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर सन्मानाने जगण्याचाही हक्क आहे. शेवटी न्यायालयाने पोलिसांना कडक ताकीद देत पोलीस अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 03:50 PM
Mumbai High Court, Justice Madhav Jamdar, Externment Order Cancelled

Mumbai High Court, Justice Madhav Jamdar, Externment Order Cancelled

Follow Us
Follow Us:

Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध जारी केलेला हद्दपारीचा आदेश रद्द केला आहे. केवळ सरकारी निर्णयाला विरोध केल्याने कोणत्याही नागरिकाला त्याच्या परिसरातून हद्दपार केले जाऊ शकत नाही. सुनावणीदरम्यान, न्यायाधीश माधव जामदार यांनी सरकार आणि पोलिसांना कडक शब्दांत फटकारले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि ज्ञानवापी मशीद यांसारख्या मुद्द्यांवरून आंदोलन केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (SDPI) सरचिटणीस सय्यद अहमद चौधरी यांना एका वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला होता. तसेच, सय्यद अहमद यांच्याविरूद्ध पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पाच एफआयआरचा हवाला दिला होता.

Dhruv Rathee च्या वादग्रस्त व्हिडिओवर १५ दिवसांत निर्णय घ्या; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारच्या GAC ला कडक निर्देश

सुनावणीदरम्यान, जेव्हा सरकारी वकील चौधरी यांनी, केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा युक्तीवाद केला. चौधरी यांच्या युक्तीवादानंतर न्यायाधीश जामदार यांनी एफआयआर च्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर जामदार म्हणाले की, याचिकाकर्त्याने केवळ ‘भाजप सरकार मुर्दाबाद’ आणि ‘अमित शाह मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या.

न्यायाधीश जामदार म्हणाले की, ” हे काय चालले आहे? सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे… ते निषेध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत—हे सगळं काय आहे? आता इतकी सगळे पेपरफुटीचे प्रकरणे समोर आली. लोकांनी निषेध केला तर तुम्ही गुन्हा दाखल कराल… हे काय आहे? निषेध करणे हा नागरिकांचा हक्क आहे… याचिकाकर्त्याने केवळ ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शाह मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत… नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का?, असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला.

Sanjay Raut News: अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण…? संजय राऊतांचा गंभीर आरोप

पोलिसांची कारवाई द्वेषपूर्ण असल्याचे सांगत ते म्हणाले की, संविधानाच्या कलम १९ आणि २१ नुसार, देशातील प्रत्येक नागरिकाला केवळ आपली मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर सन्मानाने जगण्याचाही हक्क आहे. शेवटी न्यायालयाने पोलिसांना कडक ताकीद देत पोलीस अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत.

हा आदेश केव्हा आणि कोणी जारी केला?

सय्यद अहमद चौधरी यांना एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश मुंबईच्या पोलीस उपआयुक्तांनी (झोन ६) ३ डिसेंबर २०२५ रोजी जारी केला होता, ज्याला नंतर कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांनी २७ मार्च २०२६ रोजी कायम ठेवले होते. उच्च न्यायालयाने आता हे दोन्ही आदेश पूर्णपणे रद्द केले आहेत.

Web Title: Mumbai police action against sdpi leader sayyad ahmad choudhary high court verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Mumbai High Court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.