Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेकडून यादी जाहीर

वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 10, 2025 | 10:04 PM
वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेने यादी जाहीर

वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेने यादी जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत. त्यात कित्येक रहिवाशांचे बळीही गेले आहेत. डोंगर पोखरुन उभारलेल्या अनधिकृत चाळींवर दरड कोसळून अपघात झाल्याच्या घटना दर पावसाळ्यात घडत आहेत. त्यामुळे धोक्याची सुचना म्हणून अशा दरड प्रवण क्षेत्रांची यादी जाहीर करुन पालिकेमार्फत सावधगिरीच्या सुचना दिल्या जातात. अशा संभाव्य अपघातजन्य ठिकाणांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ३३ ठिकाणे भूस्खलन आणि दरड प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आली असून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Thane News : ठाणे-कल्याण पट्टा बनतोय मृत्यूचा सापळा; २९,३२१ जणांना गमवावा लागलाय जीव

डोंगरावर वस्त्या

वसई विरार शहरातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. या डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावरही नागरिकांच्या वस्त्या आहेत.

तर काही ठिकाणी डोंगर पोखरून अगदी डोंगराच्या जवळपास भूमाफियांनी चाळी उभारल्या असून या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे.

काही वेळा

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर भागातील माती पोकळ होऊन भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असतात. यापूर्वी वसई पूर्वेच्या राजावळी -वाघराळपाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली होती. पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.

पेल्हार, वालीवमध्ये धोकादायक क्षेत्रे

मोरेगाव डोंगर नालासोपारा (पूर्व), कारगिल नगर टेपाचा पाडा, जिवदानी पाडा, आण्णा पाडा, राक्षसी पाडा, साईनाथ झोपडपट्टी, वैष्णव जिवदानी कॉम्प्लेक्स विरार पूर्व, जोत्स्ना अपार्टमेंट साईनाथ नगर, वनोठा पाडा, आचोळे डोंगरी, पडखळ पाडा, तुळींज सेवालाल नगर, निळेगांव डोंगरी नालासोपारा, संतोषभवन, शिर्डीनगर, कानुपाडा, वालई पाडा, पाच आंबा, आझाद नगर, विष्णु नगर, शांतीनगर नवजिवन, गडगापाडा, धानिव, शिरसाड, इंदिरानग र वसाहत, बिलालपाडा, अलंगपाडा, सातीवली खिंड, गोखिवरे भागपाडा, गोखिवरे, बंजार पाडा, भोयदापाडा, सातीवली डोंगरी, राजावळी, वाघरालपाडा, जानकीपाडा, गोखिवरे अशी ३३ ठिकाणे पालिकेने दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. यातील सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्रे पेल्हार आणि वालीव या दोन प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील आहेत.

Aditya Thackeray News: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या फायद्यासाठी; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना पुन्हा इशारा

नागरिकांना भेट देण्यात आल्यात विशेष सूचना

मागील वर्षी दरड प्रवण क्षेत्रांची ठिकाणे १५ होती. वाढत्या अनधिकृत चाळी, पोखरण्यात येणारे डोंगर यामुळे यावर्षी ३३ ठिकाणांची नोंद झाली आहे.

अशा ठिकाणांवर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी जनजागृती करणे, त्याभागात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सूचना फलकही लावण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: 33 landslide place in the vasai virar municipal corporation announced a list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 09:54 PM

Topics:  

  • Landslide News
  • vasai
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
2

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार
3

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा
4

Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.