ठाणे-कल्याण पट्टा बनतोय मृत्यूचा सापळा; २९,३२१ जणांना गमवावा लागलाय जीव
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडल्याने चार प्रवाशांचे बळी गेले तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे रेल्वेमुळे जाणाऱ्या बळींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे लोकलमध्ये नागरीकरणाच्या प्रमाणात जशी गर्दी वाढू लागली आहे. त्याच प्रमाणात अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या दशकात रेल्वे अपघातात मध्य रेल्वेवर २००९ ते जून २०२४ दरम्यान २९,३२१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक मृत्यूची नोंद असणाऱ्या स्थानकांमध्ये कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे.
Mumbai Local : मोठी बातमी! भाडे न वाढवता सर्व लोकल AC करणार : CM देवेंद्र फडणवीस
२०२४ मध्ये कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११६ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचा हद्दीत २०२४ मध्ये १५१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आकडेवारी सांगते. मध्य रेल्वेवर दररोज १८१० उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातात. ज्यातून ४० ते ५० लाख प्रवाशांची वाहतूक दररोज होते. गेल्या काही वर्षात रेल्वे प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढलेली असताना गर्दीच्या काळात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण फार मोठे आहे.
ठाणे स्थानकादरम्यान ठाणे खाडी परिसरात रेल्वेरुळ ओलांडताना प्रवाशांचा रेल्वे अपघातात अधिक होतात. मुंब्रा, दिवा, कल्याण ते उल्हासनगर आणि अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
उपनगरीय मार्गावर दहा वर्षात घडलेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल २७ हजार ३१२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे तसेच १७ हजार ३२५ प्रवाशांना जखमी व्हावे लागल्याची धक्कादायक गोष्ट दोन वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात उघडकीस आली होती. ही आकडेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१९ दरम्यानची होती. दररोज किमान ८ ते १० बळी जात आहेत. यातही २०१६ ते १९ या तीन वर्षात किमान ८ हजार ६४० बळी गेले आहेत. हे बळी रेल्वे रुळ ओलंडताना, चालत्या लोकलमधून खांबाला धडकून, फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकून, विद्युत तारेचा झटका लागून गेले आहेत.
Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?
विशेष करून सकाळच्या वेळी कामावर जाताना आणि संध्याकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी लोकलमधे होत असते. त्या दरम्यान दरवाजात उभे रहाणारऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे खाली पडणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी पाचवा, सहावा रेल्वे ट्रॅक सुरु झाला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडयांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाली आहे. पूर्वी उपनगरीय रेल्वे लोकलच्या १ हजार ७७४ फेऱ्या होत होत्या त्यात वाढ होऊन १ हजार ८११ करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या फेऱ्या गर्दीच्या वेळेत वाढवण्यात आल्या आहेत.