मुंबई : ताडदेव परिसरातील कमला इमारतीला लागलेल्या आग प्रकरणीच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांनी जीव गमावला आहे.
ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारत आहे. २० मजली असलेल्या या इमारतीत १९ व्या मजल्यावर २२ जानेवारीला सकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. या आगीवर १३ फायर इंजिन, ८ जम्बो टॅंकर द्वारे दुपारी १२.३० च्या सुमारास नियंत्रण मिळवले. आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने अग्निशमन दलाने त्यांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ३० जणांना भाटिया, कस्तुरबा, नायर, मसीना आदी रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास मसीना रुग्णालयात दाखल असलेल्या धवल साळसकर वय २३ वर्षे याचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा ९ वर गेला आहे.
[read_also content=”मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प गुरूवारी होणार सादर; महसूलाचे स्त्रोत घटले, आरोग्य सेवेवर भर, करवाढ नसेल https://www.navarashtra.com/maharashtra/bmc-budget-to-be-presented-on-thursday-sources-of-revenue-decreased-emphasis-on-healthcare-no-tax-increase-nrvb-229058.html”]
५ जण आजही गंभीर –
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिनम हाईट्स (कमला) इमारत आगीत एकूण ३० जण जखमी झाले. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८ जण अद्यापही रुग्णालयात असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे तर ३ जणांची प्रकृती स्थिर आहे.##
[read_also content=”रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेकडून उद्धवस्त; पक्के ओटेही काढले https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/satara/mahabaleshwar-municipality-took-action-against-encroachment-nrka-229048.html”]