Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर

Naigaon Accident News : मुंबईतील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यात नायगावमधील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून पडून एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2025 | 07:02 PM
क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Naigaon Accident News In Marathi : मुंबईतील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.मुंबईनजीकच्या नायगावमधील एका सोयायटीत खेळताना चार वर्षांच्या चिमुकलीचा तोल गेल्याने १२ व्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बहिणीकडे गेलेल्या चिमुकलीला घरी घेऊन जाण्यासाठी आई आणि ती दोघंही बाहेर पडले.चिमुकली इकडे तिकडे धावत होती. आईनं प्रेमानं धपाटा दिला आणि तिला चप्पल स्टॅण्डवर बसवलं. तिचा चपला घेण्यासाठी ती खाली वाकली आणि दोन सेकंदासाठी पाठ झाली. चिमुकली पटकन चढली आणि खिडकीवर बसायला गेली, मात्र त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. ही धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नायगावमध्ये घडली आहे.

अमृता फडणवीस बदनामीप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

आईच्या डोळ्यादेखत चिमुकली खाली कोसळली. १२ व्या मजल्यावरील पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आली. ही मुलगी आईसोबत बाहेर आली होती. यावेळी मुलगी गॅलरीत असलेल्या टेबलावर चढली. यानंतर मुलीचा तोल गेला आणि ती थेट इमारतीच्या खिडकीतून बाहेर पडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्वमध्ये ही धक्कादायक घटना घडली. नवकार फेस-१ ही १४ मजल्यांची सोसायटी आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. अनविका प्रजापती असं मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.या घटनेने चिमुकलीच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, तिच्या आई-वडिलांचा रडून रडून हाल बेहाल झाला आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी इमारतीच्या सुरक्षाव्यवस्थेचीही पाहणी केली.

दरम्यान या घटनेने उंच इमारतींमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. पालकांनी मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

विरार नारंगी, वैतरणा या दरम्यान 22 जुलै रोजी, 12921 फ्लाइंग राणी ही ट्रेन व्हीआर आउटर आणि नारिंगी एलसी दरम्यान जात असताना, अज्ञात इसमाने एका दगडाने महिला कोचची खिडकीची काच फोडली. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमाराची असल्याची रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे. ही दगडफेक का व कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही.

Mumbai Local Update : मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक मंदावली, अंधेरी सबवेला नदीचं रुप

Web Title: 4 year old girl dies after falling from 12th floor spine chilling video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
1

ऑटो नाही OYOचं! धावत्या रिक्षात जोडप्याचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral
2

आम्हाला 16 तास, कामाला 72 तास? कामावरून थकून आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला पत्नीने सुनावले खडेबोल; Video Viral

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL
3

चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral
4

बापरे! व्हिडिओ गेमच्या नादात व्यक्तीने स्वतःला तब्बल 2 वर्ष खोलीत कोंडलं, दरवाजा उघडताच दिसले किळसवाणे दृश्य; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.