रक्तरंजित महामार्ग! मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी
मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असूनही पूर्णत्वास जात नाही. २०१६, २०१८, २०२०, २०२३ आणि जून २०२५ अशा अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या गेल्या, पण प्रत्यक्षात महामार्ग अजूनही धुळीने भरलेला, खड्यांनी वेढलेला आणि अपघातांनी रक्तरंजित आहे. आतापर्यंत ४५०० जणांचे बळी महामार्गावरील खड्ड्यांनी घेतले आहेत.
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी नुकतीच पाहणी करून डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले, मात्र कोकणवासीयांचा सरकारच्या आश्वासनांवर विश्वास उरलेला नाही. प्रत्येक गणेशोत्सवाच्या तोंडावर दौरे, फोटोसेशन आणि गोड बोलांची परंपरा सुरू असते, पण वर्षभर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचा धोका पत्करावा लागतो. अपूर्ण टप्पे तातडीने पूर्ण करण्याचा ठोस आराखडा कुठे आहे? कामातील विलंबाबद्दल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली का? प्रत्येक टप्प्याचे पारदर्शक वेळापत्रक कधी जाहीर होणार? मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली जात नाही?
जनतेच्या ठाम मागण्याः प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याचे पालन करावे. जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा. मृत्यूग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी. गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. कोकणवासीयांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे आश्वासनं नकोत, आता कृती हवी. फोटो नकोत, खड्डेविरहित सुरक्षित प्रवास हवा. अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी केली आहे.
सरकार गप्प का?
मुंबई-गोवा महामार्ग पुर्णत्वास जाण्यासाठी वेळोवळी सरकारने आश्वासन दिले. मात्र आजपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात अनेकांनी जीवही गमावला. सरकारच्या दुर्लक्षाविरोधात कोकणात जनआक्रोश उसळला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी महामार्गावरच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणवासीयांचा सवाल स्पष्ट आहे. शहरातील किरकोळ घटनांवर तातडीने मंत्रिमंडळ बैठक घेणारे सरकार, कोकणातील हजारो मृत्यूवर गप्प का?
राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
१० हजारांपेक्षा अधिक अपघातांमध्ये जखमी
४५०० हून अधिक मृत्यू, १०,००० पेक्षा अधिक जखमी, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकणे वाहतूक कोंडीत अडकलेले लाखो प्रवासी हे केवळ आकडे नाहीत, तर कोकणात गमावलेले अनमोल जीव आहेत.