Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका; ‘त्या’ कारवाईला स्थगिती

डेअऱ्यांचे परवाने निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सुधारणा करण्यासाठी आवश्यक मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे संबंधित आठ डेअऱ्यांवरील निलंबनाची कारवाई न्यायालयाने तात्पुरती स्थगित केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 01:46 PM
'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने राज्यातील आठ प्रमुख दूध डेअऱ्यांविरुद्ध एफडीएने केलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे.

डेअऱ्यांचे परवाने निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सुधारणा करण्यासाठी आवश्यक मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्याबद्दल न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे संबंधित आठ डेअऱ्यांवरील निलंबनाची कारवाई न्यायालयाने तात्पुरती स्थगित केली. या डेअऱ्यांमध्ये जालना जिल्ह्यातील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट, छत्रपती संभाजीनगर येथील शिवकृपा डेअरी, जळगाव जिल्ह्यातील सरस्वती मिल्क प्रॉडक्ट, अहिल्यानगर जिल्ह्यातील कृष्णानंद फूड प्रॉडक्ट, नवनाथ मिल्क कलेक्शन, सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट, जतिन मिल्क कलेक्शन आणि जयहरी मिल्क कलेक्शन यांचा समावेश आहे.

या डेअऱ्यांवर दररोज हजारो लिटर दुधाचे संकलन होत असल्याने त्यांच्या परवान्यांवरील बंदीमुळे हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले होते.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादात एफडीएच्या नियमांचा आधार घेतला. तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधितांना त्या दुरुस्त करण्यासाठी किमान १४ दिवसांची मुदत देणे कायद्याने आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, कोणतीही मुदत न देता थेट परवाने निलंबित करणे ही घाईघाईत आणि बेकायदेशीर कारवाई असल्याचा दावा करण्यात आला.

आदेशाला अंतरिम स्थगिती

अनेक डेअऱ्यांनी तपासणीनंतर बहुतेक त्रुटी दूर केल्याचेही न्यायालयात दाखवून दिल्यानंतर खंडपीठाने एफडीएच्या निलंबन आदेशाला अंतरिम स्थगिती दिली.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तालयाच्या भेसळखोरांविरोधातील धडक कारवाईमुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीला मोठा आळा बसत असल्याचे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून ब्रँडेड दूध, पॅकबंद पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे हॉटेलांमध्येही अनॉलॉग चीजऐवजी शुद्ध पनीर वापरण्याकडे कल वाढला आहे.

Hit and Run Video : ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

Web Title: 8 action against milk dairies stayed high court deals a blow to tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Mumbai High Court
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
1

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
2

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..
3

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.