Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 557 कुटुंबांचा नव्या घरात प्रवेश, पुनर्वसनाच्या सुविधांमध्ये तडजोड नाही.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 06, 2026 | 06:44 PM
BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

Follow Us
Follow Us:
  • पुनर्विकास आंदोलनादरम्यान तरुणांवरील गुन्हे मागे घेणार
  • सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
  • वरळीतील पायाभूत सुविधांना गती देण्याची मागणी
 

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या सदनिकांचा दर्जा किंवा रहिवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विक्रीसाठी उभारण्यात येणाऱ्या घरांप्रमाणेच पुनर्वसनाची घरेही गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधांनी युक्त असावीत, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून रहिवाशांना केवळ हक्काचे घरच नव्हे, तर सर्वांगीण सुविधांनी युक्त परिसर उपलब्ध होणार आहे. यामध्ये मोकळ्या जागा, उद्याने, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याची मैदाने अशा एकूण 23 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास आंदोलनादरम्यान तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य शासन कार्यवाही करेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या विकासधोरणाचा केंद्रबिंदू असून, म्हाडा आणि अन्य शासकीय यंत्रणांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आवश्यक बदल करून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. यापूर्वी अनेक पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते. अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी शासन सक्रिय भूमिका घेत असून, नागरिकांना हक्काच्या घरांसोबतच प्रलंबित भाडे मिळावे, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुंबईकरांना अधिक मोकळ्या जागा आणि दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेसकोर्सची 125 एकर आणि कोस्टल रोडलगतची सुमारे 150 एकर जागा मिळून जवळपास 300 एकरांवर जागतिक दर्जाचे खुले उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. नागरी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि मोकळ्या जागांचा समतोल साधून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या घरात प्रवेश हा दुहेरी आनंदाचा क्षण : सुनेत्रा पवार

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बीडीडी चाळीतील 557 कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या नव्या घरात प्रवेश करण्याची संधी मिळणे हा दुहेरी आनंदाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. या कुटुंबांसाठी हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या वर्षी झालेल्या बीडीडी चाळीतील चावी वितरण कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबईच्या विकासात योगदान देणारे कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनमानाचा विचार करणे आवश्यक आहे. नव्या घरात प्रवेश करणाऱ्या कुटुंबांनी मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

बीडीडी चाळींना मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कामगार चळवळींचा मोठा इतिहास आहे. विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतीतील नागरिकांनी येथे एकत्र राहत सामाजिक एकोपा जपला आहे. नव्या इमारतींमध्ये प्रवेश करतानाही चाळ संस्कृतीतील आपुलकी, परस्पर सहकार्य आणि सण-उत्सव एकत्र साजरे करण्याची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

वरळीतील पायाभूत सुविधांना गती देण्याची मागणी

विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. हा प्रकल्प म्हाडाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरला असून, यामुळे म्हाडाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. या प्रकल्पाचा अनुभव कामाठीपुरा आणि उमरखाडी पुनर्विकासासाठीही उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…

वरळी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांना गती देण्याची गरज असल्याचे अहिर यांनी नमूद केले. फेमस स्टुडिओ परिसरातून ना. म. जोशी मार्गाकडे जोडणारा उड्डाणपूल उभारल्यास वरळीकरांना सात रस्ता आणि आर्थर रोड नाक्याला वळसा घालण्याची गरज भासणार नाही. या प्रस्तावासाठी मुंबई महापालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच वरळीतील अंतर्गत भागातील पाणीपुरवठा, रस्ते आणि अन्य नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

या कार्यक्रमाला मंत्री ॲड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील शिंदे, आमदार मनिषा कायंदे, शायना एनसी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह अन्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदे यांनी कोणते निर्देश दिले?

    Ans: पुनर्विकास प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

  • Que: बीडीडी चाळ पुनर्विकासाचा लाभ किती कुटुंबांना मिळाला?

    Ans: या कार्यक्रमात 557 कुटुंबांसाठी नव्या घरात प्रवेशाचा आनंदाचा क्षण ठरला.

  • Que: पुनर्वसनाच्या इमारतींमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत?

    Ans: मोकळ्या जागा, उद्याने, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याच्या जागा यांसह एकूण 23 प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Bdd chawl redevelopment quality homes eknath shinde rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • BDD Chawl
  • Eknath Shinde
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती
1

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
2

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही
3

अजित पवारांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवणार; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहणार, सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार; वाराणसीत संत-महंतांच्या उपस्थितीत गौरव
4

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार; वाराणसीत संत-महंतांच्या उपस्थितीत गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.