Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पवारांच्या प्रकृतीबाबत आणि डिस्चार्जबाबत महत्त्वाची माहिती दिली.

  • By विवेक
Updated On: Nov 06, 2026 | 04:59 PM
Sharad Pawar Eknath Shinde Meet

Sharad Pawar Eknath Shinde Meet

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर
  • एकनाथ शिंदेंनी घेतली ब्रीच कँडी रुग्णालयात भेट
  • दुष्काळाच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
 

Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांची तब्येत खालावली होती. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळताच राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन अहिर आणि मिलिंद देवरा देखील उपस्थित होते.

भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात

दुष्काळाच्या मुद्द्यावरही चर्चा

या भेटीत केवळ प्रकृतीची विचारपूस झाली नाही, तर राज्यातील दुष्काळ आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही चर्चा झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. पवार साहेबांनी डिस्चार्जसाठी घाई करू नये आणि काही दिवस विश्रांती घ्यावी, असा सल्लाही आपण दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी

दरम्यान, शरद पवारांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रांगच लागली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

राज ठाकरे, राहुल गांधींचाही फोन

दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, राजनाथ सिंह, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही फोन करून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत पवारांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

सध्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे?

    Ans: पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते.

  • Que: एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत काय माहिती दिली?

    Ans: शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. डॉक्टरांनीही प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं असून लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

  • Que: शरद पवारांची रुग्णालयात भेट कोणी घेतली?

    Ans: एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. याशिवाय अनेक नेत्यांनी फोनवरूनही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Web Title: Sharad pawar health update eknath shinde meets breach candy hospital vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?
1

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
2

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?
3

Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?
4

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.