Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Lalbaugcha Raja 2026: लालबागचा राजाच्या गणेशोत्सवात यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. WOL3D ने आपल्या BRAHMA उपक्रमांतर्गत 3D प्रिंटेड गणेशमूर्ती आणि लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृती सादर केल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 05:21 PM
श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Follow Us
Follow Us:
  • लालबागच्या राजाच्या उत्सवात WOL3D ने आणली तंत्रज्ञानाची जोड
  • 3D प्रिंटरवर साकारतोय बाप्पा!
  • WOL3D कडून लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृती
Lalbaugcha Raja 2026: गणेशोत्सव म्हटले की श्रद्धा, परंपरा आणि कलाकुसरीचे विविध आविष्कार पाहायला मिळतात. मात्र, यंदा मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा येथे या परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. 3D प्रिंटिंग क्षेत्रातील WOL3D ने गणेशोत्सवानिमित्त 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार केलेल्या बाप्पांच्या मूर्ती आणि लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृती सादर केल्या आहेत.

WOL3D आपल्या स्थापनेची 10 वर्षे पूर्ण करत असताना हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. कंपनीच्या BRAHMA उपक्रमाच्या माध्यमातून 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून रंगीबेरंगी गणेशमूर्ती आणि लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृती प्रत्यक्ष 3D प्रिंटिंगद्वारे कशा तयार होतात, याची झलक पाहायला मिळत आहे.

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

डिजिटल डिझाइनपासून थेट मूर्तीपर्यंत

3D प्रिंटिंग ही पारंपरिक उत्पादन प्रक्रियेपेक्षा वेगळी पद्धत आहे. ही मोल्डशिवाय केली जाणारी Additive Manufacturing प्रक्रिया असून, डिजिटल डिझाइनच्या आधारे वस्तू एकावर एक थर जोडून तयार केली जाते. या तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीचे आणि बारकाव्यांनी युक्त डिझाइन तयार करणे शक्य होते. त्याचबरोबर ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन कस्टमाइज करता येते आणि साहित्याचा अपव्ययही तुलनेने कमी करता येतो.

या उपक्रमातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे WOL3D ची उत्पादन क्षमता. कंपनीच्या BRAHMA 3D Farm मध्ये 200 प्रिंटर्स कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून दररोज सुमारे 1,000 बाप्पांच्या मूर्ती तयार करण्याची क्षमता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे 3D प्रिंटिंगचा वापर केवळ प्रोटोटाइप किंवा नमुने तयार करण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, मोठ्या प्रमाणातील रिटेल उत्पादन, वैयक्तिक गरजांनुसार कस्टमाइज्ड वस्तू आणि क्रिएटिव्ह मर्चेंडाइजसाठीही केला जाऊ शकतो, हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे.

‘भारताचा सर्वात मोठा दिव्य संग्रह उभारण्याचे उद्दिष्ट’

WOL3D चे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल चंदालिया यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कंपनीची दहा वर्षे पूर्ण होत असताना लालबागच्या राजाशी जोडले जाणे विशेष असल्याचे त्यांनी म्हटले. 3D प्रिंटेड बाप्पांच्या मूर्ती आणि लालबागच्या राजाच्या लघुरूप प्रतिकृतींना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचेही त्यांनी सांगितले.

BRAHMA च्या माध्यमातून भारतामधील सर्वात मोठा दिव्य संग्रह उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे चंदालिया यांनी सांगितले असून, लालबागचा राजा येथील उपक्रम हा त्या दिशेने महत्त्वाचा पहिला टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम

लालबागच्या राजाच्या उत्सवातील हा उपक्रम धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि नव्या उत्पादन तंत्रज्ञानाचा वाढता संगमही अधोरेखित करतो. 3D प्रिंटिंगचा वापर आता प्रोटोटाइप्सपासून कस्टमाइज्ड उत्पादने, क्रिएटिव्ह मर्चेंडाइज आणि रिटेल उत्पादनांपर्यंत विस्तारत आहे.

गणेशोत्सवाच्या पारंपरिक वातावरणात आधुनिक 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणाऱ्या बाप्पांच्या मूर्ती पाहण्याची संधी या उपक्रमामुळे मुंबईकरांना मिळत आहे. श्रद्धा, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा प्रयोग गणेशोत्सवातील एक वेगळे आकर्षण ठरत आहे.

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Web Title: Wol3d brings 3d printing technology to lalbaugcha raja ganeshotsav with 3d printed bappa idols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Lalbaugcha Raja
  • Mumbai

संबंधित बातम्या

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
1

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
2

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
3

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित
4

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.