Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Thakur College Mumbai: मुंबईतील ठाकूर कॉलेजने विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या आंदोलनानंतर महाविद्यालय प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या निर्णयामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2026 | 05:27 PM
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील ठाकूर कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत करण्यास सुरुवात
  • अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
  • सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा
नीता परब, मुंबई : कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीसीईटी) येथे विद्यार्थ्यांकडून ‘युनिव्हर्सिटी फी’ आणि ‘स्टुडन्ट एड फी’च्या नावाने आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली संबंधित रक्कम परत करण्यास सुरुवात केली असून, या निर्णयामुळे सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

प्रति विद्यार्थ्यामागे ९ हजार ४०० शुल्क आकारल्याचा अभाविपचा आरोप

अभाविप दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाकडून ‘स्टुडन्ट एड फी’च्या नावाने ३,००० हजार तर ‘युनिव्हर्सिटी फी’च्या नावाने ६,४०० अशी एकूण ९ हजार ४०० रक्कम विद्यार्थ्यांकडून आकारली जात होती. सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात आल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वसुली होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. विद्यार्थ्यांवर पडणारा हा आर्थिक भार कमी करण्यासाठी अभाविपने या प्रकरणात मागील अनेक महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता.

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने व ठिय्या आंदोलन

महाविद्यालय प्रशासनाकडून काहीही सकारात्मक निर्णय होत नसल्याने अभाविप आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. संबंधित शुल्क आकारणी थांबवून विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम परत करण्यात यावी, या मागणीसाठी अभाविपने महाविद्यालय प्रशासनाला तीन वेळा लेखी निवेदने दिले होते मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर नुकतीच निदर्शने आणि ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनानंतर महाविद्यालयाचा सकारात्मक निर्णय

या आंदोलनानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली संबंधित रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भातील प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

रक्कम परत करण्यास सुरुवात झाली ही समाधानाची बाब

यावेळी मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “ठाकूर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘युनिव्हर्सिटी फी’ आणि ‘स्टुडन्ट एड फी’च्या नावाने आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत अभाविपने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तीन वेळा निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. आता विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत करण्यास सुरुवात झाली आहे, ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितासाठी अभाविप यापुढेही सातत्याने आवाज उठवत राहील. विद्यार्थ्यांवर अनावश्यक आर्थिक भार टाकण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास अभाविप त्याविरोधात ठामपणे उभी राहील.”

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Web Title: Mumbai thakur college starts refund to students after abvp protest five thousand students benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • College
  • Mumbai
  • Student

संबंधित बातम्या

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
1

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
2

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
4

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.