Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

BEST संयुक्त कामगार कृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेतन कराराचा फेरविचार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 09:07 PM
BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Follow Us
Follow Us:

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमातील (BEST) कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

वेतन कराराच्या फेरविचाराची प्रमुख मागणी

कृती समितीने 21 जून रोजी झालेल्या वेतन करारावर आक्षेप घेतला आहे. कर्मचाऱ्यांशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा करार करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर वेतन कराराचा फेरविचार करून सर्व संबंधित संघटनांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती

समितीच्या प्रमुख मागण्या

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सरकारसमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

  • सुधारित वेतनश्रेणी लागू करावी.
  • महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा-शर्ती लागू कराव्यात.
  • आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाला शासनाकडून आर्थिक मदत द्यावी.
  • प्रलंबित वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी करावी.
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान दाम’ या तत्त्वानुसार वेतन द्यावे.

15 ऑगस्टनंतर बेमुदत संपाचा इशारा

समितीने स्पष्ट केले आहे की, 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जातील. त्यामुळे मुंबईतील बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता राज्य सरकार आणि बेस्ट प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे कर्मचारी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Web Title: Best workers strike warning indefinite strike after 15 august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • best bus
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
1

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
2

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात
3

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
4

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.