Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

PACL Scam ED Action:कृषी जमीन विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. एकरकमी रोख रक्कम तसेच हप्त्यांमध्ये पैसे भरण्याच्या विविध योजना राबवून देशभरातील लाखो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2026 | 05:30 PM
PACL Scam ED Action, Pearls Group Scam Properties Attached,

PACL Scam ED Action, Pearls Group Scam Properties Attached,

Follow Us
Follow Us:
  • पीएसीएल घोटाळ्यात ईडीचा मोठा दणका
  • प्रतीक कुमार, मुलगा व कंपन्यांच्या ४८ मालमत्तांवर कारवाई
  • गुंतवणूकदारांचे ४८ हजार कोटी अद्याप थकीत
PACL Scam ED Action: पीएसीएल (PACL) आर्थिक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली असून, पुणे, मुंबई आणि रायगड येथील तब्बल ५६७ कोटी ४५ लाख रुपयांच्या ४८ स्थावर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. प्रतीक कुमार, त्यांचा मुलगा अंश प्रतीक कुमार आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या नावावर या मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पीएसीएल आणि संबंधित संस्थांनी कृषी जमीन विक्री व विकासाच्या नावाखाली देशभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून ४८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. मात्र, गुंतवणूकदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे जमीन मिळाली नाही. त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक अडकून पडली असून, या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे चित्र आहे.

जमीन देण्याचे आमिष; निधी वळविल्याचा आरोप

ईडीने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय), नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे सुरू केला. भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब आणि ४२० अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर गुंतवणूक योजना राबविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने ३३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपपत्रानुसार, कृषी जमीन विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. एकरकमी रोख रक्कम तसेच हप्त्यांमध्ये पैसे भरण्याच्या विविध योजना राबवून देशभरातील लाखो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला. गुंतवणूकदारांकडून करारपत्रे, मुखत्यारपत्रे आणि अन्य कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मात्र, बहुतांश गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात जमीन मिळाली नाही. सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची रक्कम अद्याप परत मिळालेली नसल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

२०१६ पासून ईडीचा तपास सुरू

या आर्थिक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने २०१६ मध्ये मनी लाँडरिंगसंदर्भातील अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) नोंदविला होता. त्यानंतर २०१८ मध्ये अभियोजन तक्रार दाखल करण्यात आली. पुढे २०२२, २०२५ आणि २०२६ या वर्षांत आरोपी व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध सहा पुरवणी अभियोजन तक्रारी दाखल करण्यात आल्या. प्रतीक कुमार यांचा समावेश २० ऑगस्ट २०२२ रोजी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या पुरवणी अभियोजन तक्रारीत आरोपी क्रमांक १३ म्हणून करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने १९ सप्टेंबर २०२२ रोजी या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर ९ एप्रिल २०२५ रोजी प्रतीक कुमार यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

गुंतवणूकदारांचा पैसा मालमत्ता खरेदीसाठी!

ईडीच्या तपासानुसार, जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी पीएसीएलमधून वळविण्यात आलेल्या निधीचा वापर करण्यात आला. हा निधी मूळतः गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित मालमत्तांना गुन्ह्यातून प्राप्त झालेली संपत्ती (Proceeds of Crime) मानण्यात आले आहे.

आतापर्यंत ३० हजार कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

पीएसीएल घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या ताज्या कारवाईमुळे जप्त मालमत्तांचा आकडा आणखी वाढला आहे. या कारवाईसह भारत आणि परदेशातील जंगम व स्थावर अशा एकूण सुमारे ३० हजार २३५ कोटी २१ लाख रुपये मूल्याच्या मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आर्थिक घोटाळ्याचा पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ईडीने पीएसीएल (PACL) प्रकरणात किती रकमेची मालमत्ता जप्त केली आहे?

    Ans: ईडीने पुणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ५६७ कोटी ४५ लाख रुपये मूल्याच्या ४८ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत.

  • Que: पीएसीएल घोटाळ्यात गुंतवणूकदारांची किती रकमेची फसवणूक झाली आहे?

    Ans: कृषी जमिनीच्या नावाखाली देशभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून सुमारे ४८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करून फसवणूक करण्यात आली आहे.

  • Que: ही जप्तीची कारवाई कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे?

    Ans: ही कारवाई प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आली आहे.

Web Title: Ed attaches 567 crore properties in pacl scam pune mumbai raigad as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • crime news
  • ED Action
  • Mumbai News
  • pune news
  • raigad

संबंधित बातम्या

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती
1

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
3

DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय

AI व्हिडिओने उडवली खळबळ! कर्नाटक विधान सौधमध्ये स्फोट झाल्याचा बनाव; तरुणाला अटक
4

AI व्हिडिओने उडवली खळबळ! कर्नाटक विधान सौधमध्ये स्फोट झाल्याचा बनाव; तरुणाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.