best bus (फोटो सौजन्य- pinterest)
जानेवारी २४ ते मार्च २५ या १५ महिन्यात भाडेतत्वावरील बसचे १४६ अपघात झाले असून त्यात २८ मुंबईकरांचा मुत्यु झाला आहे. तर६२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या अपघातामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्वपुर्ण भूमिका असलेल्या बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्वावरील बसचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंच जगच लय भारी..! रुसून बसले निघून जातात गावी, नक्की चाललंय काय?
बेस्ट ही मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेस्टला गेल्या काही वर्षापासून उतरती कळा लागलेली आहे. आर्थिक अडचणीमुळे बेस्टने स्वमालकीच्या बस खरेदी करण्याऐवजी भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला बेस्टच्या जास्त भाडेतत्वावरील आहे. या भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरुस्तीपासून ते चालकांच्या वेतनापर्यंत सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न., अडचणी, समस्या आहेत.
कंत्राटी चालकांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह
गेल्या ४ वर्षांत अपघात केल्या प्रकरणी बेस्टच्या ५० चालकांना निलंबन आणि अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील दोन्ही चालकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुर्ला पश्चिमेला रात्रीच्या वेळी बेस्टच्या कंत्राटी बसचा अपघात झाला होता. त्या अपघातात ९ जणांचा बळी गेला होता. त्या अपघातानंतर कंत्राटी चालकांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
प्रवाशांनी वारंवार केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष
भाडेतत्वावरील बसचे चालक हे कंत्राटी आहेत. हे चालक गाड्या भरधाव चालवतात अशी तक्रार प्रवासी वारंवार करतात. परंतु त्याकडे बेस्ट प्रशासनाने देखील सहज दुर्लक्ष केले आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने आपला खर्च मोठ्या प्रमाणात कपात करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करताना बेस्टने आपल्या बसवरील खर्चही कमी केला. बेस्ट प्रशासनाकडून होत असलेल्या आर्थिक काटकसरीचा परिणाम बेस्टवर आणि प्रवाशांवरही होत आहे.
मुंबईकरांसाठी मेट्रो २ ब मार्गिका सज्ज
‘मेट्रो-२ ब’ अर्थात पिवळी मार्गिका, नवीन उन्नत मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत सज्ज झाली आहे. या मार्गिकतील गाडीची पहिली चाचणी आज बुधवारी १६ एप्रिलला पार पडली. अंधेरी पश्चिम ते मंडाले या उन्नत मार्गिकेवरील चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द स्थानकांदरम्यान आज मेट्रोची चाचणी अर्थात ट्रायल रन पार पडली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएकडून मेट्रो-२ ब ही मार्गिका बांधली गेली आहे. एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी चाचणीचा आढावा घेतला. ‘मेट्रो-२ ब’चा डेपो मंडाळा येथे आहे. हेच पिवळ्या मार्गिकेचे पहिले स्थानक आहे. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द यादरम्यान डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले ही पाच स्थानके आहेत. ही येलो मार्गिका चेंबूर येथे मोनोरेल मार्गिकेशी जोडली जाते. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो मार्गिकेवरून मोनोरेलच्या प्रवासासाठी जाणे सुकर होणार आहे. या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरू होणार आहे.