मुंबई – महाविकास आघाडी सरकारचे (MVA government) मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी (Resignation demand) भारतीय जनता पक्षातर्फे (bjp) आझाद मैदान मोर्चा (strike in Aazad Maidan) काढण्यात आला येणार आहे.
गुन्हेगारांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे, तरीही त्यांनी राजीनामा न दिल्याने हा मोर्चा काढला जाईल. ‘नवाब मलिक हटाव… मुंबई बचाव…’ अशी घोषणा देत हा मोर्चा निघणार आहे. भायखळा परिसरातील वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चाचा मार्ग आहे. दुपारी बारा वाजता या मोर्चाची सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली. या मोर्चाला 30 ते 40 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/went-against-the-family-and-demanded-protection-inside-the-marriage-nrps-251739.html आधी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन केलं लग्न आता म्हणते संरक्षण द्या”]