
मुंबईत पहिल्या तासात मोठी उलटफेर! महानगरपालिकेचा पहिला निकाल जाहीर
Municipal Election Result 2026 Live News Marathi : मुंबई महानगरपालिकेची सध्याची निवडणूक ठाकरे बंधूसाठी केवळ सत्तेची नव्हे, तर प्रतिष्ठेची लढाई ठरत असल्याचे चित्र आहे. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असून, त्यामुळे या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील मराठी मतदारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.याचदरम्यान मुंबईतून पहिला निकाल लागला असून काँग्रेसच्या आशा काळे यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसने आपले खाते उघडले आहे. . दक्षिण मध्य मुंबईतील धारावी कॅम्पसमधील प्रभाग क्रमांक १८३ मध्ये काँग्रेस उमेदवार आशा काळे यांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे,मुंबईतील हा आजचा पहिला निकाल ठरला आहे.
वॉर्ड क्रमांक 164 मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या शैला लांडे विजयी
वॉर्ड क्रं 214 मधून भाजपचे अजय पाटील विजयी
वॉर्ड क्रमांक 51 मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्षा टेंबलकर विजयी
वॉर्ड क्रमांक183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी
वॉर्ड क्रमांक 182 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत.
वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत.
मानखुर्दमधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहेत. ते भाजपचे प्रवक्ते आहेत. पत्रकार ते राजकीय नेता असा त्यांचा प्रवास आहे.
तसेच भाजपची आघाडी ५० च्या पुढे गेली आहे. भाजप युती ५२ जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना युती ३१ जागांवर पुढे आहे. काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे.
तसेच मुंबईत काँग्रेस, मनसे आणि भाजप यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या फेरीमध्ये आशा काळे यांनी आघाडी घेतली होती. तसेच मनसेच्या उमेदवार पारूबाई कटके यांचा पराभव करत हा गड राखला आहे. धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि आशा काळे यांच्या विजयाने काँग्रेसने आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. माजी काँग्रेस नगरसेवक दीपक काळे यांच्या आशा काळे या पत्नी आहेत.
भाजप-शिंदेसेना महायुती आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती यांच्यात चुरस असताना देखील काँग्रेसने पहिला निकाल आपल्या नावे करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील इतर प्रभागांमध्येही काँग्रेसचे उमेदवार अनेक ठिकाणी आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.