Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध
महापालिकांच्या निवडणूकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी निकाल जाहीर करत विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे. अद्याप काही ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. ही मतमोजणी सुरु असतानाच आता जळगावात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यांनतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मात्र यावेळी प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण आणखी वाढू नये आणि परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीवेळी उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. यावेळी तिथे असलेल्या काही ईव्हीएम मशीनचं सील तुटल्याचं उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पाहिले. यानंतर त्यांनी याप्रकरणी आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर मतमोजणी केंद्रात गोंधळ सुरू झाला. यावेळी केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. मतमोजणी केंद्रातील नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या प्रकरणी मुख्य निवडणूक निरीक्षक आणि आयुक्तांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
जळगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक १३ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल देवकर विजयी झाले आहेत. मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी महापौर ललित विजय कोल्हे, त्यांची आई सिंधू विजय कोल्हे आणि अमृता चंद्रकांत सोनवणे, संतोष मोतीराम पाटील आणि प्रविण रामदास कोल्हे आघाडीवर आहेत.






