मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक महापालिकांसह विविध महापालिकांच्या निवडणूका पार पडत आहेत. मतमोजणी सुरु असून कोण विजयी गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध कल समोर येत असून पुणे आणि मुंबईमध्ये देखील भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विरोधकांकडे मतमोजणीमध्ये अनेक गैरप्रकार झााल्याचे सांगण्यात आले. तसेच बोटावरची शाई पुसून दुबार मतदान केले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा
मुंबईत महायुतीचाच विजय – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की, 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल, निकालानंतर भाजपचं मोठा पक्ष हे पुन्ह अधोरेखित होईल, तसंच मुंबईत महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी अधोरेखित केले आहे.
हे देखील वाचा : “मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले, शाई पुसली गेली”, संजय राऊतांचा सत्ताधारांवर गंभीर आरोप
BMC साठी प्रशासनाची मोठी तयारी
बीएमसीच्या २२७ वॉर्डांसाठी एकूण अंदाजे १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. २०२५-२६ या वर्षासाठी त्यांचे बजेट अंदाजे ₹७४,४०० कोटी आहे. गेल्या निवडणुका २०१७ मध्ये झाल्या होत्या. निवडून आलेल्या बीएमसीचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. आता, या मोठ्या बजेटची जबाबदारी एक नवीन संस्था घेईल. बीएमसीने स्पष्ट केले आहे की केवळ अधिकृत उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि वैध ओळखपत्र असलेले मीडिया कर्मचारी यांनाच मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाईल. केंद्रांवर अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध असतील. कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मीडिया आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.






