BMC Elections News update: आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; तीन शिलेदार मैदानात
BJP’s master plan for the upcoming elections; Three players in the fray
BMC Elections News update: राज्यात लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांही होणार असून भाजपने त्याअनुषंगानेही आपली वाटचाल सुरू केली आहे. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये भाजप आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. महत्त्वाची बाबत म्हणजे राज्यातीलआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदवीधर निवडणुकांसाठीही भाजपने मास्टरप्लॅन आखल्याची माहिती आहे.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले अशून त्यांनी तीन खेळाडू मैदानात उतरवले आहेत.पुण्यासाठी राजेश पांडे, नागपूरसाठी सुधाकर कोहळे आणि संभाजीनगर मतदारसंघासाठी संजय केनेकर यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी या तीन जणांवर सदस्य नोंदणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू केल्याचे दिसत आहे.
ठाण्यातील भिवंडीत कारखान्याला भीषण आग; अनेक साहित्य आगीत जळून खाक
याशिवाय मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठई आढावा बैठकांचा जोरही वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांनी तयारी सुरू केली असून भाजपकडून महायुतीसोबतच आणि स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे.
मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत साटमांकडून कोअर कमिटीच्या बैठका सुरू आहेत. नुकतीच उत्तर मध्य मुंबई जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. दररोज एका लोकसभा जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार असून, मुंबईतील सहा लोकसभांनिहाय कोअर कमिटी बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
बैठकीत निवडणुकीसंदर्भात रणनिती आखण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक वॉर्डची परिस्थिती तपासण्यात आली. सध्या भाजपची स्वतंत्र ताकद किती आहे आणि महायुती म्हणून त्यांची ताकद किती आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या वॉर्डांत भाजप कमकुवत आहे, तिथे सदस्य नोंदणी मोहिमेद्वारे संघटन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महाविकास आघाडीची वॉर्डनिहाय स्थिती काय आहे, याचीही माहिती बैठकीत घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदलाची प्रक्रिया सुरू आहे. या भागात, उत्तर मध्य मुंबई भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे यांनी शुक्रवारी त्यांच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम तयार केली आहे आणि त्यातील प्रत्येक वर्ग आणि गटाला प्रतिनिधित्व देऊन सुसंवाद राखण्याचा प्रयत्न केला आहे.
घोषणेनुसार, कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष, ८ मंत्री, एक कोषाध्यक्ष, एक युवा मोर्चा अध्यक्ष आणि एक महिला मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला आणि दलित समाजालाही त्यात स्थान देण्यात आले आहे.
सरचिटणीस पदाची जबाबदारी हरीश भांडीगेन, मिलिंद शिंदे, शितल मकवाना (महिला-अनुसूचित जाती) आणि शुभ्रांशू दीक्षित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, राजेश दाभोलकर, श्रीकृष्ण आंबेकर, किरत सुंता, हटल माला (महिला), ईश्वर तायडे, रवींद्र घाग, प्रकाश मोरे आणि चंद्रकांत मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका,
याशिवाय ८ नेत्यांना मंत्री करण्यात आले आहे. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी मनेका सुंके (महिला) यांच्याकडे देण्यात आली आहे. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्मण दुबे यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महिला नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी सायली दोंदे यांच्याकडे महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे म्हणाले की, संघटनेतील सर्वांना समान संधी देणे आणि सामूहिक नेतृत्वाला चालना देणे हा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात नवीन कार्यकारिणी उत्तर मध्य मुंबईत भाजपला आणखी बळकट करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आगामी बीएमसी निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या रणनीतीमध्ये ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केला.