ठाण्यातील भिवंडीत कारखान्याला भीषण आग; अनेक साहित्य आगीत जळून खाक
मुंबई : ठाण्यातील भिवंडीत एका कारखान्याला भीषण आग लागली. कामतघर परिसरात असलेल्या बालाजी डाईंग फॅक्टरीत ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. ज्या इमारतीत आग लागली ती इमारत दोन मजली इमारत असून, ती आगीच्या भक्ष्यस्थानी होती. कारखान्यात ठेवलेल्या कपड्यांमुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या मजल्यांनाही वेढले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आगीच्या अनेक घटना आत्तापर्यंत पाहिला मिळाल्या आहेत. भिवंडीतील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील एका कापड डाईंग कंपनीत शुक्रवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. बालाजी पॉलिस्टर लिमिटेड नावाच्या या कंपनीत आग लागताच परिसरात गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. जेव्हा या कारखान्याला आग लागली तेव्हा सुदैवाने कारखाना बंद होता, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आगीचे कारण सध्या कळू शकले नाही.
शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता
भिवंडी शहरातील कामतघर येथील निवासी भागात असलेल्या एका कंपनीत आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मध्यरात्री मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. कारखाना वेळेवर बंद झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत आगीमागील कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी केली जात असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.