झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो 'या' आजारांचा धोका
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा रात्री किंवा दुपारच्या वेळी झोपल्यानंतर अचानक हातापायांना मुंग्या येतात किंवा हात पाय अचानक सुन्न होऊन जातात. हातापायांना मुंग्या येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण वारंवार हातापायांना मुंग्या येत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर किंवा आहारात बदल झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला वारंवार हातापायांना मुंग्या येत असतील तर आरोग्यासंबंधित कोणत्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो,याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या आजारांची लागण शरीराला झाल्यास अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड झाल्यानंतर उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘हे’ गंभीर आजार, वेळीच व्हा सावध
मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्मण झाल्यानंतर स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. अचानक झोपल्यानंतर किंवा कोणताही काम करताना हातापायांमध्ये मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर मेंदूमध्ये रक्ताची गाठी तयार होतात. यामुळे स्ट्रोक येतो. याशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाल्यानंतर मेंदूच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहचते.
शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. शरीरासाठी अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. या विटामिनच्या कमतरतेमुळे हातपाय सुन्न होणे किंवा हातांमध्ये मुंग्या येऊ लागतात. त्यामुळे वारंवार ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो. हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी डाव्या हातापायांमध्ये मुंग्या किंवा सुन्नपणा जाणवू लागतो. घाम येणे, मळमळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वारंवार चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हातापायांना सतत मुंग्या का येतात?
बराच वेळ एकाच स्थितीत बसल्याने किंवा झोपल्याने रक्तप्रवाहात अडथळा येतो, ज्यामुळे मुंग्या येतात.हातांचा सतत वापर करणाऱ्या कामांमुळे मज्जातंतूंवर ताण येऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा:
हातातील मुंग्या अचानक सुरू झाल्या असतील. मुंग्या येण्यासोबतच मुठीत बळ कमी होणे किंवा सुन्नपणा जाणवत असेल.मुंग्या वारंवार येत असतील आणि घरगुती उपायांनी फरक पडत नसेल.
हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवण्याची कारणे?
मधुमेहामुळे मज्जातंतूंना इजा होऊ शकते, ज्यामुळे मुंग्या येणे हे सुरुवातीचे लक्षण असू शकते. विटामिन बी१२ सारख्या व्हिटॅमिनची कमतरता मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम करू शकते.