मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जाणारी प्रवासी बोट उलटली (फोटो सौजन्य-X)
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले. माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 66 प्रवाशांची सुटका करण्यात आली. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली. घटनेची माहिती मिळताच नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर काही जणांना तात्काळ वाचवण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती. एका स्पीड बोटने या फेरीबोटीला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल जात आहे. त्यानुसार, ३.३० वाजताच्या सुमारास दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर ५ ते ८ किमी आत समुद्रा ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या फेरीबोटीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास ३० किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागतो.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (18 डिसेंबर ) दुपारी ही घटना घडली. त्यावेळी हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनारा सोडून सुमारे 50 मीटर आत गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. योगायोगाने एक मोठी बोट तिथे पोहोचली आणि बुडणाऱ्या बोटीतील काही प्रवाशांना मोठ्या बोटीवर नेण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माहिती मिळताच इतर अनेक बोटीतील मदत पथके घटनास्थळी पोहोचली असून प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीत 88 प्रवासी होते. आतापर्यंत किती प्रवाशांची सुटका करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे पहिले प्राधान्य आहे. त्यासाठी गोताखोरांची टीम समुद्रात रवाना करण्यात आली आहे.






