Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंती उत्सवाचे आयोजन; अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे मुंबईच्या प्रदीर्घ सामाजिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतिक आहे. माधवबाग संकुलाचा इतिहास तब्बल १५० वर्षांपूर्वीचा असून, जेव्हा हा परिसर ‘लालबाग’ म्हणून ओळखला जात असे

  • By तेजस भागवत
Updated On: May 24, 2025 | 11:08 PM
माधवबाग येथील मंदिरासाठी येणार अमित शाह (फोटो सौजन्य - Instagram)

माधवबाग येथील मंदिरासाठी येणार अमित शाह (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: माधवबाग संकुलातील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २७ मे २०२५ रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या विशेष प्रसंगी कॅबिनेट मंत्री आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. सोबत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

मंदिराच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या पुरेचा, सरफोजी राजे भोसले संस्था यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

श्री लक्ष्मी नारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटी यांच्या विश्वस्त मंडळातर्फे आयोजित हा कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होईल. या दिवशी महाराष्ट्रातून भाविक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

श्री लक्ष्मी नारायण मंदिर हे मुंबईच्या प्रदीर्घ सामाजिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतिक आहे. माधवबाग संकुलाचा इतिहास तब्बल १५० वर्षांपूर्वीचा असून, जेव्हा हा परिसर ‘लालबाग’ म्हणून ओळखला जात असे. तेव्हा इ. स. १८७४ साली कपोल समाजातील दोन मान्यवर उद्योजक श्री वर्जिवंदास माधवदास आणि श्री नरोत्तम माधवदास यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी मोठा भूखंड विकत घेतला. त्यानंतर १८७५ साली, श्री लक्ष्मी नारायण मंदिराची स्थापना करण्यात आली.

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती; मंत्री लोढांच्या पाठपुराव्याला यश

या मंदिराचे बांधकाम प्रसिद्ध वास्तुविशारद श्री भीमा रामजी यांच्या देखरेखीखाली पोरबंदरच्या दगडांनी करण्यात आले होते. पारंपरिक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर आजही मुंबईतील एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. श्री लक्ष्मी नारायण मंदिर आपल्या १५० व्या वर्षात पदार्पण करत असताना, हा महोत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो श्रद्धा, सेवा आणि सामाजिक नेतृत्वाच्या प्रदीर्घ परंपरेचा गौरव देखील आहे.

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Celebrations organized to mark the 150th anniversary of shri lakshmi narayan temple cm fadnavis and minister lodha attend the program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • amit shaha
  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
2

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
3

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
4

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.