Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : ‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर

अर्ली डिटेक्शन क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी ‘सेंट’ने मुंबईतील गोरेगाव येथे भारतातील आपल्या दुसऱ्या केंद्राची सुरुवात केली आहे.शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 11, 2026 | 05:46 PM
‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर

‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर

Follow Us
Follow Us:
  • सेंटचे मुंबईत ‘क्लिनीकल प्रिव्हेंशन सेंटर’ कार्यान्वित
  • मुंबईतील विस्तारासह भारतातील दुस-या केंद्राचा शुभारंभ
  • आजारांचे लवकर निदान करण्यावर भर
मुंबई : ‘अर्ली डिटेक्शन’ (आजारपणाचे लवकर निदान) क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी ‘सेंट’ने (CENT) आज मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे भारतातील आपल्या दुस-या केंद्राच्या शुभारंभाची घोषणा केली. बेंगळुरूनंतरचे हे नवीन केंद्र सेंटच्या विस्ताराचा टप्पा अधोरेखित करते आणि भारतातील अत्यंत गतीमान शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध करून देते.

सेंटची स्थापना संस्थापक आणि बोर्ड चेअर शशांक एनडी, तसेच सह-संस्थापक अर्पित गर्ग आणि अंशुल खंडेलवाल यांनी केली असून, हे तिघे तंत्रज्ञान, उत्पादन, ऑपरेशन्स आणि सदस्य अनुभव या मुख्य विभागांचे नेतृत्व करत आहेत. गंभीर आजारांची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची ओळख पटली पाहिजे, या संकल्पनेवर आधारित हे मुंबई केंद्र सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक आरोग्य मूल्यांकन प्रदान करते. यामध्ये प्रगत इमेजिंग, ब्लड बायोमार्कर्स, एआय-आधारित विश्लेषण आणि डॉक्टरांचा सल्ला या सर्व सुविधा एकाच भेटीत उपलब्ध होतात.

धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त

मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबतची जागरूकता सातत्याने वाढत असताना, विशेषतः नोकरीपेशा व्यावसायिक, संस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबांमध्ये दीर्घकालीन आरोग्यासाठी ‘प्रोअॅक्टिव्ह’ दृष्टिकोन स्वीकारण्याकडे कल वाढत असताना हे केंद्र सुरू झाले आहे. जीवनशैलीशी संबंधित वाढते आजार, तणाव, हृदयविकाराचा धोका आणि चयापचय विकारांमुळे नियमित वार्षिक तपासणीच्या पलीकडे जाऊन सखोल आरोग्य तपासणी करण्याबाबत रस वाढत आहे.

गोरेगाव (पश्चिम) येथे स्थापित हे केंद्र विशेषतः प्रतिबंधात्मक काळजीसाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक भेटीमध्ये संपूर्ण शरीराची एमआरआय, अल्ट्रा-लो-डोस कार्डियाक सीटी, डेक्सा, ईसीजी आणि १२० हून अधिक रक्त आणि बायोमार्कर चाचण्यांचा समावेश आहे. यानंतर डॉक्टरांचा सल्ला आणि सेंटच्या मालकीच्या एआय प्रणालीद्वारे तयार केलेला एकत्रित जोखीम अहवाल दिला जातो. हा संपूर्ण अनुभव साधारण दोन तासांत पूर्ण होईल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे.

अनेक पुरवठादारांकडून तुकड्या-तुकड्यांत केल्या जाणाऱ्या पारंपारिक आरोग्य तपासणी पॅकेजच्या उलट, सेंट हृदयरोग, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आणि मेटाबॉलिक जोखमींचे लवकर निदान करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रमाणित प्रोटोकॉलचे पालन करते.

या प्रसंगी बोलताना सेंटचे सह-संस्थापक आणि सीबीओ अंशुल खंडेलवाल म्हणाले, “आज लोक आरोग्याकडे ज्या प्रकारे पाहत आहेत, त्यात स्पष्ट बदल दिसून येत आहे, विशेषतः वेगवान शहरी वातावरणात. लक्षणे दिसल्यानंतर आजाराचा शोध लागण्याऐवजी गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्यापूर्वीच त्यावर मात करण्याची लोकांची इच्छा आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी हा विचारपूर्वक आणि प्रोअॅक्टिव्हरीत्या करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग बनत आहे. गेल्या काही महिन्यांतील आमच्या बेंगळुरू केंद्राच्या अनुभवातून, आपल्या आरोग्याबद्दल सखोल माहिती मिळवू इच्छिणाऱ्या लोकांकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईसारख्या शहरात, जिथे दीर्घकालीन आरोग्य आणि प्रतिबंधाबाबत जागरूकता आणि इच्छाशक्ती झपाट्याने वाढत आहे, तिथे हा अनुभव आणताना आम्हाला आनंद होत आहे.”

मुंबईतील हे केंद्र कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूमध्ये केलेल्या लाँचिंगवर आधारित असून, हे भारतातील नियोजित मल्टी-सिटी रोलआउटचा भाग आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित झाल्यापासून सेंटच्या भागीदार-नेतृत्वाखालील नेटवर्कने सात शहरांमध्ये २,००० हून अधिक स्कॅन पूर्ण केले आहेत. यापैकी २६% स्कॅनमध्ये वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले, तर ३% प्रकरणांमध्ये तातडीने वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असलेले गंभीर आजार आढळले. विशेष म्हणजे, स्कॅनच्या वेळी या व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती.

सेंट आपल्या केंद्रांमधील इमेजिंग आणि डायग्नोस्टिक पायाभूत सुविधांसाठी ‘सीमेन्स हेल्थिनिअर्स’ सोबत जवळून काम करत आहे. मुंबईतील केंद्र प्रगत एमआरआय, सीटी आणि डेक्सा सिस्टीमने सुसज्ज असून, ते विशेषतः प्रतिबंधात्मक तपासणी आणि सेंटच्या प्रमाणित क्लिनिकल प्रोटोकॉलसाठी कॉन्फिगर केले गेले आहेत.

सेंटचे संस्थापक आणि बोर्ड चेअर शशांक एनडी म्हणाले, “माझ्या मनाच्या जवळ असलेल्या मुंबई शहरात सेंटला आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे केंद्र प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबद्दल लोकांच्या विचारात आणि कृतीत अर्थपूर्ण बदल घडवून आणेल, अशी आम्हाला आशा आहे. आजची बहुतांश आरोग्य व्यवस्था लक्षणे दिसल्यानंतरच हस्तक्षेप करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, तरीही हृदयरोग, कर्करोग आणि मेटाबॉलिक विकार यांसारखे आजार अनेक वर्षे शांतपणे शरीरात वाढत असतात. आमचा विश्वास आहे की आरोग्यसेवेतील पुढचा बदल हा आजारांचे लवकर निदान आणि वेळेवर कृती करण्यासाठी योग्य पाया तयार करण्यातून येईल. सेंट नेमकी हीच प्रतिबंधात्मक पायाभूत सुविधा उभारत आहे.”

Mumbai News: रेल्वेतील एफटी कोट्याचा झाला गैरवापर! ३९ प्रकरणांत ३.५६ लाखांचा दंड; १२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Web Title: Cent launches second healthcare center in mumbai goregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • AI health
  • Healthcare
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.