Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

उल्हासनगर-अंबरनाथ रेल्वे मार्गावर रुळावर पडलेल्या लोखंडी बॉक्समुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कर्जत लोकलचे ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांनी प्रसंगावधान राखत गाडी तात्काळ थांबवून रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले असून, या घटनेचा रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 04:42 PM
रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स
  • ट्रेन मॅनेजरच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
  • लोकलला बसला जोरदार धक्का
Mumbai Local News Marathi: मध्य रेल्वेवरील उल्हासनगर-अंबरनाथ रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. कर्जत लोकलचे ट्रेन मॅनेजर (गार्ड) संतोष शांताराम जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रुळावर पडलेल्या लोखंडी बॉक्सची वेळेत दखल घेण्यात आली आणि शेकडो प्रवाशांचा जीव वाचला.

नेरळ येथील रहिवासी असलेले संतोष जाधव हे कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाडीचे ट्रेन मॅनेजर म्हणून कर्तव्य बजावत होते. कर्जत डाऊन लोकल (गाडी क्र. TS-1, डिटेल क्र. 808) उल्हासनगर स्थानकातून सुटल्यानंतर उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान (किमी 57/32 जवळ) गाडीला अचानक जोरदार धक्का बसला आणि मोठा आवाज झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संतोष जाधव यांनी तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यानंतर इंटरकॉमद्वारे मोटरमन आर. एस. सैनी यांना घटनेची माहिती दिली.

Mumbai Local: ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत

गाडी थांबल्यानंतर संतोष जाधव यांनी स्वतः खाली उतरून तपासणी केली. कोच क्रमांक 5360 C मधून प्रेशर गळतीचा आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लेडीज डब्यात तैनात असलेल्या होमगार्ड जवानासोबत त्यांनी मागे जाऊन पाहणी केली असता, किमी 57/32 ते 57/34 दरम्यान रेल्वे रुळावर मोठा लोखंडी चौकोनी बॉक्स अडकलेला असल्याचे आढळले.

संतोष जाधव आणि होमगार्ड जवान यांनी तत्काळ तो लोखंडी बॉक्स रुळावरून बाजूला केला. या कामामुळे सुमारे 10 ते 15 मिनिटे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. त्यानंतर ट्रेन मॅनेजर यांनी इमर्जन्सी कंट्रोल आणि ईएमयू कंट्रोलला संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि आवश्यक सुरक्षितता तपासणीनंतर लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

दरम्यान, उल्हासनगर-अंबरनाथ तसेच अंबरनाथ-बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रुळावर सापडलेला हा लोखंडी बॉक्स कामादरम्यान खाली पडला की तो कोणी मुद्दाम रेल्वे रुळावर ठेवला होता, याचा तपास रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलीस करत आहेत. या घटनेत ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांनी दाखवलेली समयसूचकता आणि धाडसामुळे संभाव्य मोठा रेल्वे अपघात टळला. त्यांच्या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त होत असून, रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Web Title: Central railway train manager santosh jadhav averts major accident near ambernath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • central railway
  • Karjat
  • Mumbai Local

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.