Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2024 | 04:52 PM
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार?  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाचे हल्ले होत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. ” वेळ आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू,” मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे.नवी मुंबईत सिडकोच्या कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले,” लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देत आहोत. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबील, युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहे. यासाठी करतो, बघतो, पाहते, कमिटी वैगेरे असे काहीही नाही. थेट डिबीटी. आज राज्य सरकार डिबिटीच्या माध्यमातून पैसे देत आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.

हेही वाचा: एकांतवास, ना सूर्यप्रकाश! कैद्यांना नरकयातना देणारे ‘अंडा सेल’ काय असते?

गेल्या 10 वर्षांतील मोदी सरकारने केलेलं काम आणि मागच्या 50-60 वर्षांतील काँग्रेसच्या राजवटीतील कामांची तुलना करा. मोदी सरकारने केलेल्या कामात भ्रष्टाचाराचा एकही डाग दिसणार नाही. पण ठाकरे सरकारच्या काळात कोविड सेंटर, खिचडी आणि डेडबॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला. आता तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार राहिला नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

इतकेच नव्हे तर, कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पण या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर भविष्यात 1500 चे 2000, अडीच हजार नक्की करू, तेव्हा हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हे जनतेचे पैसे आहेत. पुर्वी हफ्त्यांचे सरकार होतं. पण हे बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारे सरकार आहे. असंही शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा:ग्रामीण भागातही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण, स्वयं स्तन तपासणी करण्याचा तज्ज्ञांनी दि

पण हे सगळे विरोधक तुमच्या तयार केलेल्या योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुमच्या खात्यात पैसे येऊ लागले तर तेव्हाही ते बोलले पैसे लवकर काढून घ्या, हे सरकार पैसे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. ज्या सावत्र भावांनीच खोडा घातला, ते तुमच्याकडे आल्यावर त्यांनाही जोडा दाखवा. आधीच्या सरकारने मेट्रो 3, अटल सेतू, कारशेड, समृद्धी हायवे प्रकल्प बंद केले. पण आपलं सरकार आलं आणि हे स्पीड ब्रेकर काढून आम्ही सर्व कामे सुरू केली. आता आपल्या सरकारचं दोन वर्षातील काम आणि ठाकरे सरकारचं अडीच वर्षातील काम. जनतेच्या दरबारात होऊन जाऊद्या दूध का दूध पानी का पानी, असे खुले आव्हानही एकनाथ शिंदेंनी यावेळी दिले.

लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

हेही वाचा:ग्रामीण भागातही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण, स्वयं स्तन तपासणी करण्याचा तज्ज्ञांनी दि

Web Title: Chief minister eknath shindes indicative statement that the money of ladaki bahin yojana will increase nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 04:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Baheen Yojna

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
4

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.