Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्हाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही’; मुख्यमंत्र्यांनी ‘या’ मुद्यावरून साधला राहुल गांधींवर निशाणा

महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2025 | 07:26 AM
राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच...

राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच...

Follow Us
Follow Us:

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि. 3) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात संसदेत गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, “लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान काही महिन्यांत राज्यातील मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी वाढली आहे”. राहुल गांधी यांच्या या विधानावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्हाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही’, असे ते म्हणाले.

Introspect instead of insulting Maharashtra !
You have insulted the people of Maharashtra, the land of Chhatrapati Shivaji Maharaj, BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule and Veer Savarkar.
You have questioned the democratic mandate given by the people of Maharashtra…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2025

महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना माफी मागण्यास सांगितले आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘तुमचा पक्ष हरला म्हणून तुम्ही एनडीएला महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही बदनामी करण्यात मग्न आहात. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. माफ करा राहुल गांधी जी’.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विधान केले होते. ते म्हणाले होते की, ‘मला या सभागृहाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची काही आकडेवारी आणि माहिती लक्षात आणून द्यायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अचानक सुमारे 70 लाख नवीन मतदार आले. आम्ही निवडणूक आयोगाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील सर्व मतदारांची नावे, पत्ते आणि मतदान केंद्रे द्यावीत, जेणेकरून आम्हाला हे नवीन मतदार कोण आहेत याची गणना करता येईल. मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग आम्हाला ही माहिती देईल’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

राहुल गांधींकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक

याचवेळी त्यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’चा विचार चांगला होता. पण त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. असं म्हणत नाही की पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण त्यांच्या प्रयत्नांना कोणतंही यश मिळाले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही उत्पादन चीनला सोपवले. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आले. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis criticized on rahul gandhi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 07:17 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’
1

Rahul Gandhi : राहुल गांधींचा मोठा निर्णय! ‘उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार’

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
2

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
3

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Ravindra Chavan : ‘सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण’; रविंद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.