Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: “महाराष्ट्र लवकरच भारताच्या…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2025 | 09:56 PM
CM Devendra Fadnavis: “महाराष्ट्र लवकरच भारताच्या…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असून, बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने मुंबई विद्यापीठात एआय सेंटरची स्थापना केली आहे. जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याने नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

डेटा सेंटर आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारण्यात येत असून, २०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल. मुंबई ही भारताची ‘फिनटेक राजधानी’ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

🔸CM Devendra Fadnavis at the 'NASSCOM Technology and Leadership Forum 2025'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2025'मध्ये प्रमुख उपस्थिती
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'नैसकॉम टेक्नोलॉजी एंड लीडरशिप फोरम 2025' में विशेष उपस्थिति

🕦… pic.twitter.com/8HHjgHYDEM

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 24, 2025

नाशिक कुंभमेळा; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, आणि आभासी अनुभव यासाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महाकुंभमेळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. ‘ड्रोन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण देऊन कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा मानस आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार असल्याचे सांगून मुखमंत्री म्हणाले, ही ‘इनोव्हेशन सिटी’ देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तीनशे एकरमध्ये ही सिटी विकसित केली जाणार असून या सिटीमध्ये तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर भर दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे जीसीसी पार्क विकसित करणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या कल्पना आणि योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Web Title: Cm devendra fadnavis said maharashtra state will soon lead indias ai and technology revolution mumbai nasscom technology and leadership summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • CM Devendra Fadanvis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!
1

Grok Chat Leaked: एलन मस्कची हत्या कशी करू… गुगलवर लिक झाले Grok युजर्सचे चॅट, सर्वत्र उडाला गोंधळ!

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
2

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल
3

St Bus : गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद; ५१०३ बस फुल्ल

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.