Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

मुंबईतील टँकर लॉबीवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? असा सवाल लोंढे यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2026 | 02:09 PM
मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून?
  • टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद?
  • काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टँकर लॉबीवरुन सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि या सोसायटीमधील नागरिकांना पाण्याचे टँकर बोलावावे लागतात. एखाद्या भागात विकास झाला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकरने पाणी पुरवठा करणे हे समजू शकते परंतु पाणी कपात असताना या टँकरला पाणी कोठून मिळते, या टँकर लॉबीचे मालक कोण व त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

मुंबईतील टँकर लॉबीवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, पाणी टंचाई असतानाही टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोच कसा या टँकरला पाणी मिळते कोठून? म्हणूनच तर शंका बळावते की टँकर लॉबी कोण आहे? या टँकर लॉबीचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक आहेत का? नगरसेवकांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे नातेवाईक आहेत का? हे सत्य पुढे आले पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : ‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’ म्हणत तरुणावर हल्ला; डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

सरकार चौकशी वगैरे काही करत नाहीच पण निदान सत्य तरी पुढे आणा की हे टँकर कोणाचे आहेत आणि ते टँकरचे ज्यांचे आहेत, त्यांचे आणि नगरसेवकांचे लागेबांधे काय आहेत? मुंबईकरांना याचे उत्तर हवे आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन, बीएमसी आयुक्त व राज्य सरकार यांनी या टँकर लॉबीवर सविस्तर खुलासा करावा, असेही काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. लोढे यांच्या प्रश्नांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन, बीएमसी आयुक्त व राज्य सरकार काय उत्तर देणार हेही पाहणं महत्वाच ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : वराळेत जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर हल्ला, कोयत्याने सपासप वार करुन संपवलं; आठ जणांवर गुन्हा दाखल

Web Title: Congress leader atul londhe has raised questions regarding the tanker lobby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Congress

संबंधित बातम्या

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी
1

विरोधी पक्षाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; शिवाजी काळगेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Sonia Gandhi Belonging Autobiography:चीन, मोदी अन् आरएसएसचा उल्लेख; ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकात नेमकं आहे काय?
2

Sonia Gandhi Belonging Autobiography:चीन, मोदी अन् आरएसएसचा उल्लेख; ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकात नेमकं आहे काय?

Sonia Gandhi Book Controversy: सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकावरून वाद; पेंग्विनचा भारतात प्रकाशनास नकार, काय आहे खरं कारण?
3

Sonia Gandhi Book Controversy: सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग’ पुस्तकावरून वाद; पेंग्विनचा भारतात प्रकाशनास नकार, काय आहे खरं कारण?

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?
4

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.