Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जयकुमार गोरेंना रोज ३ हजार रुपये देतो, विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसा’; अतुल लोंढेंचे खुले आव्हान

Atul Londhe on Jaykumar Gore: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आक्षेप घेत विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 07:59 PM
Atul Londhe on Jaykumar Gore

Atul Londhe on Jaykumar Gore

Follow Us
Follow Us:
  • MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक
  • जयकुमार गोरेंच्या विधानाचा निषेध
  • विद्यार्थ्यांची माफी मागण्याची मागणी

मुंबई: पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांनी १० दिवस आंदोलन करून भाजपा महायुती सरकारला झुकवले पण सरकारचे मंत्री आता या आंदोलनावर पातळी सोडून टीका करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावर केलेली टीका हा विद्यार्थ्यांचा घोर अपमान आहे. “मंत्री जयकुमार गोरे यांना मी दररोज ३ हजार रुपये देतो, त्यांनी आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत बसावे”, असे खुले आव्हान काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

Maharashtra Politics: ‘भाजपाची सत्तेसाठी किती लाचारी!’ मनसेला पाठिंबा देताच ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ७० हजार पदे रिक्त असताना सरकार त्याची भरती करत नाही, एमपीएससीच्या परिक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले आहे, परीक्षा घेतली तर पेपरफुटी होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भ्रष्ट कारभार सुरु आहे, तो सरकारला सुधारता येत नाही. विद्यार्थ्यांना १०-१० दिवस आंदोलन करावे लागते, या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा भाजपा सरकारने खेळखंडोबा करून ठेवला आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी कोणी आंदोलन केले तर सरकारला उत्तर द्यावेच लागते. पुण्यात राज्यातील गावखेड्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससी परिक्षेची तयारी करत आहेत, मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य हे या गोरगरिब, प्रामाणिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा अपमान आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी, असे अतुल लोंढे म्हणाले.

विद्यार्थी आंदोलनामागे परकीय शक्ती आहे, असा मंत्री जयकुमार गोरे यांनी जावईशोध लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मजबूत?’, हातात मागील १३ वर्षे देश आहे तर मग परकीय शक्ती पुण्यापर्यंत आल्याच कशा? मोदी सरकार व फडणवीस सरकार काय झोपा काढत आहे का? फक्त कोणत्याही आंदोलनाला बदनाम करणे हीच भाजपाची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी म्हणाले, विद्यार्थी आंदोलनात परकीय शक्ती, जंतर मंतर वरील आंदोलनातही परकीय हात आहे, देशद्रोही आहेत असे आरोप करून भाजपा स्वतःचे हसे करून घेत आहे. देश सांभाळता येत नाही तर खुर्चीवर बसलात कशाला? हेच विद्यार्थी तुम्हाला घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही अतुल लोंढे यांनी दिला आहे.

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी

Web Title: Atul londhe demands apology jaykumar gore mpsc protest pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • Jaykumar Gore
  • MPSC Exams
  • Protest

संबंधित बातम्या

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL
1

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर
2

Albania News : सर्वोच्च न्यायालय कार्यालय पेटवलं ;भ्रष्टाचार ,बेरोजगारी मुळे तरुणाई रस्त्यावर

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?
3

France Protest: अश्रुधुराने वाचवली मॅक्रॉन यांची खुर्ची; काय घडले आंदोलक एलिसी पॅलेसपासून अवघ्या 300 मीटरवर पोहोचल्यावर?

Portugal Protest: फ्रान्स, इटलीनंतर आता पोर्तुगाल पेटले; रोनाल्डोच्या मायदेशात घरांच्या वाढत्या किमतीविरोधात हजारो लोक रस्त्यावर
4

Portugal Protest: फ्रान्स, इटलीनंतर आता पोर्तुगाल पेटले; रोनाल्डोच्या मायदेशात घरांच्या वाढत्या किमतीविरोधात हजारो लोक रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.