
फोटो सौजन्य सोशल मिडिया
सकाळी 09.18 वाजता मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली आणि 9.25 वाजता ही आग ‘लेव्हल-1’ प्रकारची असल्याचे सांगण्यात आले. दादारच्या पश्चिम मधिल शिवसेना भवनासमोर असलेल्या 50 मजली कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागली होती.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नसून अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बेस्ट (BEST), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), आरोग्य अधिकारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल झाली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
आग लागताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटना स्थळी दाखल झाली होती, ही आग सकाळी लागल्यामुळे दादरच्या कोहिनूर मॅालमध्ये जास्त गर्दी नव्हती यामुळे आगिवर नियंत्रण मिळवण्यासीठी यश आले.पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढण्यात आले. शॅाक सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आली.
कोहिनूर स्क्वेअरमधील इमारतीतील एशियन किचन हॅाटेलच्या किचनला आग लागली होती. सकाळची वेळ असल्याने फार गर्दी नव्हती अग्निशमन दलाच्या जवानानी आणि पालिकेच्या कामगारांनी बचाव कार्य केल. मॅाल मध्ये फायर सिस्टम लावण्यात आला होता की नाही. यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात मोहीम; वांद्रे-खार-सांताक्रझसह अंधेरीत अनधिकृत बांधकामांवर हातोडा