
फोटो सौजन्य सोशल मिडिया
सध्या मुंबईच्या दादरच्या फुल मार्केट मध्ये झेंडूच्या फुलांचे दर प्रतिकिलो 20 ते 60 रुपये असून शेवंतीच्या फुलांचे दर 200 ते 250 रुपये किलो असल्याने सणासुदीच्या काळात फुलांच्या बाजारात 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
फुलांचे बाजारभाव हे पूर्णपणे माल किती प्रमाणात बाजारात येतो यावर अवलंबून असतात. माल कमी आल्यास भाव आणखी वाढतील आणि माल जास्त झाल्यास भाव कमी होतील. येत्या दोन दिवसात भाव आणखी वाढतात का, याकडे विक्रेत्यांचे लक्ष आहे.
दसरा आणि दिवाळीच्या काळात फुलांची मागणी वाढत असल्याने फुलविक्रेत्यांना व्यवसायातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, फुलांची आवक किती होते, यावर बाजारभाव अवलंबून असतात. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बाजारभावात आणखी वाढ होते का, याकडे विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.
सणासुदीच्या काळात बाजार भाव वाढतो, फुलांचा माल जास्त असला की भाव कमी होतो. माल कमी असेल तर बाजार भाव वाढतो. झेंडू आणि इतर फुलांचे भाव सध्या 20ते 25 रुपये किलो दराने विकले जातात. पण सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव जास्त असतो. शेवंती 200 ते 250 किलो दराने विकले जात असून गेल्या वर्षी प्रमाणे बाजार भाव सारखाचं आहे. सिजन असल्याकारणाने सध्या फुलांना चांगला भाव मिळत आहे. असे फुल विक्रेत्यांचे म्हणने आहे.
झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित