Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Kabaddi Tournament : शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अनेक रंगतदार सामने पाहण्यास मिळाले. यातील एका सामन्यातील गुरुप्रसाद पंडितच्या लक्षवेधी हनुमान उडीच्या चढायांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 08:45 PM
Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Kabaddi Tournament : हनुमान उडीने गाजवले मैदान; विजय क्लब, नवोदितची दमदार आगेकूच!

Follow Us
Follow Us:
  • गुरुप्रसादच्या हनुमान उडीची चर्चा
  • कुमार गटात विजय क्लबने साऊथ कॅनराला नमवले
  • व्यावसायिक गटात अटीतटीचे सामने
कबड्डीच्या मैदानावर दुर्मिळ होत चाललेल्या ‘हनुमान उडी’ने शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या (Kabaddi Tournament) दुसऱ्या दिवसाचा रंगतदार माहोल अधिकच खुलवला. गुरुप्रसाद पंडितच्या लक्षवेधी हनुमान उडीच्या चढायांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले; मात्र कुमार गटात साऊथ कॅनरा संघाला विजय मिळवता आला नाही.
विजय क्लबने साऊथ कॅनराचा 41-21 असा 20 गुणांनी पराभव करत दणदणीत विजय नोंदवला. दुसरीकडे, नवोदित संघानेही समर्थ स्पोर्ट्स क्लबवर मात करत विजयी आगेकूच कायम ठेवली.

दादर येथील भवानी माता क्रीडांगणावर शिवनेरी सेवा मंडळाच्या 58 व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. कुमार गटात अमर क्रीडा मंडळ, श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळ, नवोदित संघ आणि विजय क्लब यांनी विजय मिळवला.
महिला गटात स्वामी समर्थ महिला संघ आणि जिजामाता संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. निखिल लॉजिस्टिक्सचे सुरेश भाई कदम यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे.

कुमार गटात अमर, श्रीराम आणि नवोदितची बाजी

कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने गोकुळ क्रीडा मंडळावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. अमरच्या साहिल बनगरने चढायांमध्ये प्रभावी खेळ केला, तर शुभम भागवतने बचावात मोलाची भूमिका बजावली. गोकुळच्या श्रेयश थोरातने चढायांमधून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळाने सिद्धी प्रभा फाउंडेशनवर पाच गुणांनी मात केली. श्रीरामच्या अमित सिंगने चढायांमध्ये गुणांची कमाई केली, तर हर्ष काळेने पकडींमध्ये प्रभावी कामगिरी केली. सिद्धी प्रभा फाउंडेशनच्या सिद्धेश भोसलेने चढायांतून आव्हान उभे केले, तर दिलीप साईलने बचावात झुंज दिली.

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

महिला गटात स्वामी समर्थ, जिजामाता विजयी

महिला गटात स्वामी समर्थ महिला संघाने आई महाकाली महिला संघावर २७ गुणांनी विजय मिळवला. स्वामी समर्थच्या प्रीती हांडेने चढायांमध्ये प्रभावी खेळ केला, तर आर्या रावळने पकडींमध्ये योगदान दिले. आई महाकालीच्या कीर्ती गोपाळेने चढायांमधून संघाला लढतीत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सामन्यात जिजामाता संघाने गणेश स्पोर्ट्स क्लबचा ४१-१६ असा पराभव केला.

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

व्यावसायिक गटात एका गुणासाठी चुरस

व्यावसायिक गटातील दोन्ही सामने अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार ठरले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गंधेकर इलेक्ट्रिकल यांच्यातील लढतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. विजयी संघाच्या शुभम खारगावकरने चढायांमध्ये, तर जितेंद्र यादवने पकडींमध्ये प्रभावी कामगिरी केली. गंधेकर इलेक्ट्रिकलच्या आदित्य घोडेरावने चढायांमधून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर सौरभ दिवेकरने बचावात योगदान दिले. दुसऱ्या सामन्यात वेस्टजेन ॲकॅडमीने सिद्धी कन्स्ट्रक्शनवर एका गुणाने मात केली.

Web Title: Kabaddi tournament shivneri kabaddi mahotsav vijay club navodit win rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • dadar
  • Kabbadi
  • Sports

संबंधित बातम्या

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार
1

Kabaddi Tournament : पंचगंगाची ‘सुपर’ सलामी! गोल्फादेवीवर एका गुणाने मात; शिवनेरी कबड्डी स्पर्धेत थरार

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
2

ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
3

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम
4

Chess Tournament : निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत तामोजी चक्रवर्ती, अमृता लाड प्रथम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.