"शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई...", उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Uddhav Thackeray shivtirth live News in Marathi: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज (२ ऑक्टोबर) दसरा मेळावा आयोजित करून ५८ वर्षांची परंपरा कायम ठेवत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या मेळ्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व आहे. यावेळी भाषणाला सुरुवातील शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
या वर्षीचा दसरा मेळावा विशेषतः महत्त्वाचा आहे कारण तो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या पक्षाची ताकद आणि राजकीय प्रभाव दर्शवितो. हा मेळा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करण्याची संधी देईल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून राज ठाकरे आणि मनसे-शिवसेना युतीशी संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या स्थितीवर काय परिणाम होईल हे देखील यावरून स्पष्ट होऊ शकते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आज दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जो चिखल झाला ती कमळाबाईची कृपा आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर कडवी टीका केली. तसंच भाषणाची सुरुवात करताना त्यांनी महापुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा विषय मांडला. त्यामुळं शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी केली.
यानंतर, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १०० व्या दसरा मेळाव्यावर भाषण केले. गांधींच्या जयंतीच्या दिवशीच संघाचा १०० वा वर्धापन दिन आला आहे, तर याचा अर्थ काय? संघाच्या शंभर वर्षांच्या कष्टाला विषारी फळे लागली आहेत. मोहन भागवत मुस्लिम नेत्यांसोबत बसतात आणि दुसरीकडे भाजपचे लोक हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवत आहेत. भाजपला आकार नाही, रूप नाही, ध्येय नाही, धोरण नाही तो कसाही वाढतो, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी संघावर आणि भाजपवर सडकून टीका केली. क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा बेशरम आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान साधलं. भाजपची औलाद पगारी मतदार तयार करत आहे, असंही ठाकरेंनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपला टार्गेट केलं.
संघाला १०० वर्षे झाली आहेत. ही काही थोडीथोडकी वर्षे नाहीत. संघाच्या शंभरीला गांधी जयंंती आहे. हा काय योगायोग आहे का? मला कळत नाही. जशी संघाला १०० वर्षे झाली आहेत. आता लढणारी माणसं आता कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी वाटचाल आणि नीती या सरकारची आहे. सोनम वांगचुक या माणसाने अत्यंत दुर्गम भागात हाडं मोडणाऱ्या थंडीत आपले जवान नीटनेटके रहावेत म्हणून सोलार टेन्कॉलॉजीवर छावण्या बांधून दिल्या. पाण्याचं दुर्भिक्ष्य होऊ नये म्हणून आईस स्तुपाची योजना आणली. त्याने न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरु केलं. लेह लडाखसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरु केलं. त्यानंतर सगळे पेटले, लेह लडाखमध्ये सुरु झालं. त्यानंतर मोदीबाबांनी त्यांना उचलून रासुका खाली त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकलं. मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशद्रोही नव्हते. शिष्टमंडळातर्फे ते पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवलं गेलं अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.