उद्धव ठाकरेंना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा
दसरा मेळाव्यादिवशीच ठाकरेंना धक्का
कोकणात एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग
आज विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. दरम्यान आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पर पडत आहे. थोड्याच वेळात दोन्ही दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मात्र दसरा मेळावा सुरू होण्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचा कोकणातील एक शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील नेते राजन तेली हे आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राजन तेली हे कोकणातील एक मोठे नेते असल्याचे म्हटले जाते. सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये राजन तेली यांचे नाव मोठ्या नेत्यांमध्ये घेतले जाते.
राजन तेली आज दसरा मेळाव्यातच ठाकरेंच्या पक्षाला रामराम करणार आहेत. ते आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. दसरा मेळाव्याआधीच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले?
दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी पेटवलेली ठिणगी शिवसेनेची, त्याचा वणवा या मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. हे शिवतीर्थ आहे. हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.”
ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत पाऊस आहे. मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा आढकरी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यांनी दिल्लीतून अमित शहांचे जोडे आणलेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत. त्याचे पूजन ते करणार आहेत. आम्ही विचारांची पूजा करतो. हे शहांच्या पादुकांची पूजा करत आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो.”