मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली (Photo Credit -Social Media)
मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना वगळण्यात आले आहे. हे व्यवसाय पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेनुसार सुरू राहतील. हा निर्णय राज्याची ‘रात्रीची अर्थव्यवस्था’ (Night Economy) वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७’ नुसार, दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी आहे. या कायद्यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
या कायद्यानुसार, कोणतीही दुकान किंवा आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास कायदेशीर अडचण नाही. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अनेक ठिकाणी याला विरोध होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
शासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट प्रकारच्या आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी नाही. २०२० च्या अधिसूचनेनुसार, या आस्थापनांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन, सरकारने स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाला एक स्पष्ट संदेश दिला आहे. दारू विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना वगळून इतर कोणत्याही दुकानांना २४ तास सुरू ठेवण्यापासून रोखू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि नागरिकांसाठी मोठी सोय झाली आहे.