Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Mumbai News: घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल. घरांना योग्य भाव मिळत नव्हता, आता खरेदी-विक्रीला चालना मिळून योग्य किंमत मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 11, 2025 | 06:44 PM
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा
दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा
सुधारीत भोगवटा अभय योजनेची एकनाथ शिंदेंकडून घोषणा

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (‘ओसी’) अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील (Mumbai)सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी ‘सुधारीत भोगवटा अभय योजना’ लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याचा फायदा वर्षानुवर्षे ओसीपासून वंचित दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल.

विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले गेल्या साडेतीन वर्षांपासून महायुती सरकार मुंबईचा कायापालट करत आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मूळ मुंबईकरांना पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि येथे वास्तव्यास असलेल्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

२० हजार इमारती आणि १० लाख मुंबईकरांना लाभ

मुंबईत अशा जवळपास २० हजार इमारती आहेत ज्यांच्या मूळ मंजूर आराखड्यात किरकोळ बदल केल्यामुळे त्यांना ओसी मिळू शकलेली नाही. ओसी नसल्याने या इमारतींमधील रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि मलनिःसारण कर भरावा लागतो. या योजनेमुळे सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना आणि १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना थेट फायदा होणार आहे. अनेक गृहनिर्माण संस्था या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा करत होत्या, त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने मोठा दिलासा देत असल्याचे उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

या योजनेमुळे मुंबईकरांना ओसी नसल्यामुळे भरावा लागणारा दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार नाही. घरांच्या खरेदी-विक्रीसाठी बँकांकडून कर्ज मिळणे सुलभ होईल. घरांना योग्य भाव मिळत नव्हता, आता खरेदी-विक्रीला चालना मिळून योग्य किंमत मिळेल. पुनर्विकासात आता नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल, जे आधी केवळ मंजूर नकाशापुरते मर्यादित होते त्याचबरोबर महापालिकेच्या कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आता दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.

◻️LIVE 📍विधान भवन, नागपूर 🗓️ 11-12-2025 📹 राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन – विधानसभेतून लाईव्ह https://t.co/YXgW10pHNR — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 11, 2025

या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना, नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी (अतिरिक्त चटई क्षेत्र/फंजिबल क्षेत्र) अधिमूल्य (Premium) आकारताना रेडीरेकनरच्या प्रचलित दरात थेट ५०% सवलत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सहा महिन्यांत जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, ६ महिने ते १ वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या ५० टक्के दंड आकारला जाईल.

केवळ संपूर्ण इमारतच नाही, तर एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिकाधारकाला वैयक्तिकरित्या ओसी हवी असल्यास, त्यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींनाच नाही, तर अनधिकृत बांधकामांच्या यादीत अडकलेल्या हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे, ज्यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल.

Maharashtra Politics : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

मुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस असून, त्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्या आहेत, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी या सुधारीत अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Dcm eknath shinde announced revised occupancy regularization scheme for 20000 buildings in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai

संबंधित बातम्या

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास
1

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश
2

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
3

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा
4

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.