
Buldhana Drought News
वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला. काही भागांत पिके करपली असून, सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या अनियमिततेमुळे हिरावला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि अपेक्षित उत्पन्न न मिळण्याची परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावरच आपल्या समस्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात येईल,’ असे आश्वासन दिले. त्यामुळे शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. यावेळी कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, जलसंधारण मंत्री संजय राठोड, स्थानिक शेतकरी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील एक-दोन दिवसात शासनाकडून कोणती मदत जाहीर केली जाते, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असले तरी त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला, केंद्र सरकारकडूनही वेळोवेळी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर