Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका

राज्यात 15 तारखेला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2026 | 09:09 PM
Eknath Shinde On BMC Election: “… तो मुंबई खतरे मैं”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर मिश्किल टीका
Follow Us
Close
Follow Us:

शिवाजी पार्कमध्ये पार पडली महायुतीची सभा 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी फडणवीस, शिदेंची सभा 
ठाकरे बंधूंच्या आरोपाना दिले प्रत्युत्तर

Maharashtra Politics: राज्यात 15 तारखेला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजप-शिवसेना युती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत होणार आहे. काल शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधू यांनी सभा घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह युतीवर टीका केली होती. त्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खऱ्या अर्थाने आजची सभा ही परिवर्तनाची नांदी आहे. काल इथे एक सभा झाली. त्यात शिव्या, टोमणे बोलून गेले. त्याची आम्हाला सवय झाली. मुद्देच नाहीततर बोलणार काय? आपली ही आजची सभा उत्तर सभा नसून, गेल्या साडे तीन वर्षात मुंबईत केलेल्या कामांचा लेखाजोखा तसेच पुढील पाच वर्षात काय करणार हे सांगणार आहोत.”

ठमी कधीही आरोपांना आरोपांने  उत्तर दिले नाही. या ठिकाणी भावनेचे नाही विकासाचे राजकारण अपेक्षित आहे. विकसित भारत, विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. मुंबई राज्याचा मानबिंदू आहे. निवडणूक आली की काही लोकांना मराठी माणसाची आठवण येते. एरवी कधी मराठी माणसांकडे लक्षही देत नाहीत. दिवसभर नेटफ्लिक्स अन् वेळ मिळाला तर पॉलिटिक्स..एवढंच त्यांचा इंटरेस्ट आहे. पांच साल घर मै, चुनाव आया तो मुंबई खतरे मै. मुंबईच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. ”

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि मराठीच होईल.तुम्ही मराठी माणसासाठी काय केले? मुंबईत मराठीच महापौर होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार. आम्ही केलेली कामे आधी पहावी आणि मग विरोधकांनी यांच्यावर बोलावे. 10 ते 12 हजार गिरणी कामगार यांना महायुती सरकारने घरे दिली. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. त्यांच्या काळात केलेले एक तरी काम सांगा. महाविकास आघाडी सरकार आल्यावर सगळी विकासकामे रोखली. आमचे सरकार आल्यावर सगळी विकासकामे सुरू झाले. या लोकांनी कामे अडवून धरल्याने दहा हजार कोटींनी वाढला. तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबईकरांचे हाल झाले. ही लोक विकासविरोधी आहेत.”

Web Title: Dcm eknath shinde criticizes to uddhav and raj thackeray on bmc local body election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • devendra fadnavis
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
1

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
2

Maharashtra Politics : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती
3

Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
4

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.